झाला का ग्ं स्वयंपाक
नसेल झाला तर जाऊ
हॉटेलात जेवायला झाऽऽक !😊
खरंच गडे तुम्ही बोलला
हे कसं सुचलं हो आज ?
सांगा ना गडेऽऽ मला
दिलदारपणाचं राज !😏
साठी उलटली तरी कधी
सोबत नेलं नाही फिरायला
वेडबिड तर नाही ना लागलं
ह्या माझ्या कंजुस नव-याला 🤔
तो कानाजवळ जाऊन
हळूच काही तरी बोलला
ऐकताच मात्र ती तर
लागली चक्क नाचायला💃
खरंच का हो संसारात
वाढत्या वयात असं घडतं ?
म्हातारे होता होता कोणी
बायकोच्या प्रेमात पडतं ?🤭
अगं,आजपर्यंत तू फक्त…
घरातली कामं करित राहिली
रांधा वाढा अन् उष्टी काढा
स्वतः यातच अडकवत गेली😘
रोजच्या जगण्यात विसरलो
प्रेमाच्या गुलूगुलू गप्पा आपण
म्हणून डिनर घेतांना चघळू
पहिल्या दिवसाची गोड आठवण😄
घरात पोरं आणि सुना आल्या
सरली मग आपली प्रायव्हसी
चऽऽल घराबाहेर लुटू आपण
आपल्या तरुण मनाची वीसी🥰
पोरं आणि सुना आपल्या
बघ,संसारात रमलेत छान !
आत्ता आपणही करु मौजमज्जा
मैं तेरा राजा तू मेरी जान…!😋
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद
😊
उत्तर द्याहटवाआभारी!🙏
हटवाव्वा..अतिशय सुंदर👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी!🙏
हटवाखुपचं सुंदर रचना...गडे...👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद मॅडमजी!🙏
हटवाक्या बात...... क्या बात है
उत्तर द्याहटवाबहोत खुब 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
सुंदर समिक्षा... आभारी सर!🙏
हटवाअप्रतिम रचना.... नवरा बायको मधला संवाद खूप छान मांडला आहे..👍👌✍️🍫🌹
उत्तर द्याहटवासुंदर समिक्षा... आभारी मॅडम!🙏
हटवाखुप सुंदर रचना...👌👍💐
उत्तर द्याहटवाअतिशय अप्रतिम रचना केली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर,आणि वास्तविक रचना केली आहे सर,संसाराचे बघता बघता दोघांसाठी वेळच उरत नाही.👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर लाईन सर
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवा