🌹 नवरात्रोत्सव : सातवी माळा : 🌹
💎 देवी स्वरुप : देवी कालरात्री 💎
नवरात्रोत्सवातील सप्तमी तिथी ही देवी कालरात्रीला समर्पित आहे. सातवी माळ झेंडूच्या फुलांची बांधावी, व भक्ताने देवीची श्रद्धाभावे उपासना करावी.
💎 कालरात्री देवीचे स्वरुप
देवीचे स्वरुप रात्रीच्या अंधारासारखे काळे आहे.देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतात.देवीचे केस विस्कटलेले असून गळ्यात विद्युल्लता सारखी चमकणारी नर मुंडमाला घातली आहे.देवी कालरात्री चतुर्भूज असून देवीच्या एका होती कटोरा,एका हातात लोहंकुश आहे.आणि उर्वरित दोन हात मुद्रा स्थितीत असून पैकी एक हात वर मुद्रा आणि दुसरा अभय मुद्रेत आहे.देवी त्रीनेत्रा असून गर्दभावर स्वार आहे.तिची भावमुद्रा भयानक कोपीष्ट अशी आहे.💎 देवीची प्रकट कथा
असे म्हटले जाते की, भगवती कालरात्री देवीची उत्पत्ती असूर चण्ड-मुण्ड यांच्या निर्दालनासाठीच झाली.कथानुसार दैत्य राज शुंभच्या आज्ञेने चण्ड-मुण्ड आपली चतुरंग सेना घेऊन प्रत्यक्ष देवीला बंदी करण्याच्या हेतूने गिरीराज हिमालय पर्वतावर गेले.तेथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष देवीला बंदिवान करण्याचे धाडस केले.त्यांच्या त्या दृष्ट कृत्याने देवी भगवती अत्यंत क्रोधीत झाली.देवीला प्रचंड संताप झाला..क्रोधाने भगवतीचे वदन प्रचंड काळे झाले आणि बाहू मध्ये प्रचंड स्फूरण निर्माण झाले.त्याक्षणी अत्यंत क्रुद्ध देवी भगवतीने कालीस्वरुप धारण केले.
💎 देवीचे आवडते रंग
आज बुधवार तिथी महाष्टमीच्या पावक पर्वाला नवरात्रोत्सवाला कालरात्रीची पूजा करण्यात येते. देवीला गडद नीळा रंग अतिप्रिय असून या रंगदर्शनाने देवीचे रुप अतुलनीय आनन्दाची अनुभूती देते. निळा रंग हा समृद्धी आणि शांतीचे प्रतिक म्हणून वापरला जातो.नवदुर्गा देवीने कालरात्री रुपात चण्ड-मुण्ड दैत्यांचा विनाश करुन त्रिखंडात सुख ,समृद्धी आणि शांतता निर्माण केली होती.देवीच्या या रुपातील दर्शनाने भक्तांच्या जीवनात चैतन्य येऊन समृद्धी आणि शांतता निर्माण होते.अशी दृढ समज आहे.
💎 कालरात्री देवीची आयुधे
देवी कालरात्रीने आपल्या एका हातात तलवार आणि एका हातात पाशांकुश,शरीरावर लाल रंगाचे चर्मांबर परिधान केले असून,आणि गळ्यात नरमुण्डमाला विराजित आहेत. प्रकटप्रसंगी देवी कालरात्रीच्या अंगावरील मांस पुर्णपणे नष्ट होऊन देवीचे शरीर हे फक्त हाडांचा सापळाच उरला होता.असे वर्णन आढळते.भगवतीचे हे रुप प्रचंड भितीकारक व क्रुद्ध भासत होते.देवीचे तोंड प्रचंड विशाल ,आणि सळसळत्या जीभेमुळे देवीचे स्वरूप पाहताच भिती वाटावी इतके भयप्रद बनले होते.डोळ्यातून क्रोधाचा अंगार बाहेर पडत होता.देवीच्या भयंकर गर्जंनांनी दशदिशा जणू प्रचंड नाद उमटत होता.देवीने कालरात्री रुपात महाभयानक अशा दैत्यांचा वधाचे सत्र आरंभिले.आणि चण्ड-मुण्डच्या चतुरंग सेनेवर देवी कालरात्री वायुवेगे तुटून पडली व सैन्याचे भक्षण करीत देत्य सेनेला त्राहीमाम करीत सुटली.
💎 देवी कालरात्रीच्या जप मंत्र
" दंष्ट्राकरालवदने शिरोमालाविभूषणे।
चामुण्डेुण्डमथने नारायणी नमोऽस्तु ते।
या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।। "
देवी कालरात्री भक्तवत्सला असून सदैव आपल्या भक्तांवर कृपा करणारी म्हणून ओळखली जाते. ती भक्तांनी केलेल्या भक्तीने प्रसन्न होऊन शुभदायक फल देते.म्हणून देवी कालरात्रीला " शुभंकरी " असेही म्हणतात.भक्तांच्या सर्व दुःख,दैन्य,व्याधी,ताप दूर करणारी ही कालरात्री समस्त संकटे दूर करण्याचे वरदान देणारी म्हणून तिची ख्याती आहे.
💎 देवी कालरात्री पूजनाचे फलित
देवीची कृपा मिळविण्यासाठी तिला अनन्य भावे शरण जाऊन भक्ती,पूजन केले असता,ती भक्तांना पावते.देवीचे पवित्र गंगाजलाने,पंचामृताने आणि फुलं,गंध, अक्षतांनी पूजा करावी.देवीला गुळाचा प्रसाद अती प्रिय असून हा प्रसाद द्यावा.देवी कालरात्री चे पूजन करतांना ब्रम्हचर्य व्रताचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून काया वाचा मनाने भक्त पावक असावा.
[ टिप - सदर लेखातील माहिती ही सामान्य माहिती असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ पंडीताची मदत घ्यावी.ब्लाॅग लेखक कोणतीही हमी देत नाही.]
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अतिशय सुंदर माहिती दिली सरजी ✍️����
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती दिली सर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर सुंदर माहिती👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर , आध्यात्मिक माहीती.... धन्यवाद...������♀️������
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर माहिती 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवा।। जय श्री कालरात्री माता ।।
उत्तर द्याहटवा🌹🌹🌹🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती दिलीत सर🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाअतीशय सुंदर अध्यात्मिक माहितीपुर्ण लेख 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवा