Kaayguru.Marathi

शनिवार, ऑक्टोबर ०२, २०२१

जेव्हा नव-याला दिवस जातात!


बाई,कधी नव्हे आज मला 
पहाटे स्वप्न असे पडले
बाई,सांगताना वाटते लाज
पण सारे विपरितच घडले😛

नव-याला झोपेतनं उठताच
मळमळ ओकारी झाली
जेवणाखाण्याची म्हणे
इच्छाच नाही राहिली🤭

नव-याचा अशा वागण्याने
मी दवाखान्यात नेले
तपासणीअंती डॉक्टर म्हणे
अहो बाई,यांना दिवस गेले !😋

तुम्ही घ्या यांची काळजी
झाला यांना सव्वा महिना 
दर महिन्याला आठवणीने
सोनोग्राफीला नक्की आणा👍

मनापासून देवबाप्पाचे मानले 
मी खूप खूप आभार
नव-याला सहज झेपू दे
बाप्पा नऊ महिन्याचा भार ! 🙏

घरी येताच ते मला म्हणाले
हौसेने पुरव माझे डोहाळे
खावेसे वाटतात गं मला
कच्चे चिंच कैरी अन् आवळे 🍏

त्यांना रोज उठता बसता 
सूचना झाल्या माझ्या सुरु
पटकन उठण्या बसण्याचे
काम आता नको हो करु!🤲

सात महिन्यांचा काळ
सहजच निघून गेला
डिलिव्हरीचा पिरीएड
फक्त दोन महिने राहिला✌️

नववा महिना लागताच
त्यांना सुरु झाल्या कळा
वेदना असह्य होऊन
सुरु झाला कळवळा🧔

डॉक्टर म्हणे डिलिव्हरीला
थोडाही नको उशीर
लवकरात लवकर ह्यांचे
करावे लागेल सिझर🤭

नव-याच्या चिंतेने माझे
व्याकूळ झाले मन
फॉर्म भरुन देऊन
सही केली मी पटकन📝

डिलिव्हरीसाठी नव-याला
ऑपरेशन रुमला नेलं 🛌
अर्ध्या तासाच्या परिश्रमाने
गोंडस बाळ जन्मा आलं🚼

अलार्म वाजताच सहाचा
स्वप्न माझं गाभडलं
नव-याचा पहिल्या बाळाचं
बारसंही राहून गेलं…!🧭

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
    म्हसावद
   मोबाईल नं.9421530412








१३ टिप्पण्या:

  1. 😂😂😂🙏अप्रतिमच रचना..सर..अप्रतिमच कल्पना👌👌👌😂😂

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान अप्रतिम 👌
    सुंदर काॅमेडी....👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏.

    उत्तर द्याहटवा
  3. दाद द्यावी लागेल सर तुमच्या कल्पनाशक्तीची काय सुंदर कॉमेडी रचना केली अप्रतिमच अगदी 👍👍👍👍👍👌👌👌👌👌✍️✍️✍️✍️🙏🙏😄😄😄😄😄😄😄😄😄

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...