* माझे तोरणमाळ *
माझ्या सातपुडाच्या गळा शोभे
सप्तशिखरांची माळा
तयात गिरी तोरणमाळ
भासे स्वर्गसुखाचा मळा १
माझ्या तोरणमाळची माती
देते इतिहासाची साक्ष
नांदला पांडवांचा वाली
राजा इथे नाव तयाचे युवनाश्व २
वळणावळणाची बिकट
जाता येता खुणावतो
सुंदर सात पायरीचा घाट ३
माझ्या तोरणमाळची भूमी
अहो किती पावन पावन
माय मांडीवर विसावले
पार्श्वनाथ आणि नागार्जून ४
माझ्या तोरणमाळची कथा
गातो व्यास न् कालिदास
धन्य धन्य या भूमिसी
सहस्रदा नमवितो मी शिष ५
माझ्या तोरणमाळवर फिदा
आषाढ - श्रावण घननीळा
संगे घेऊनिया येतो
फूल फूलपाखरांचा मेळा ६
निसर्गराजाचे वरदान
साग पळस बांबूच्या वनी
खग गाती मंजूळ गाणं ७
माझ्या तोरणमाळच्या रक्षणा
दोन पुण्यकन्या खास
गिरीशिखरी एक तोरणाई
दूजी सिताखाई निवास ८
इंद्रलोकीचे सौंदर्य आगळे ९
माझ्या तोरणमाळच्या अधरी
पद्माचे मोहक दल उले
ईको-पाॅईडशी बोलता
निनाद तिनदा उसळे १०
माझ्या तोरणमाळ येऊनी
पहा खडकी पाॅईंट
घे रे ...! डोळा साठवून
भूदेवीच्या स्वर्गीय थाट ११
माझ्या तोरणमाळच्या भूवरी
उभा ईश् गोरक्षनाथ
महाशिवरात्रीच्या रात्री
त्यांसी भेटे कैलासनाथ १२
तोरणमाळची होळी पहा खरोखरी
ढोल दणाणतो मनोहारी
शिबलीनृत्य गेरनृत्यात बेधुंद
बिरि-बासरी संगे नर नारी १३
माझ्या तोरणमाळच्या उदरी
वनौषधी कितीऽऽतरी
अमृतकुंभ धरूनिया हाती
येथे उभा भासे हो धन्वंतरी १४
माझ्या तोरणमाळच्या भूवरी
गमते घरं कौलारू
गर्द हिरव्या रानात जणू
हिंडतो सम्राटाचा वारू १५
माझ्या तोरणमाळच्या वनराई
गातो नि रमतो वनपिंगळा
लाविला या एका खगाने
अख्खा जगताला लळा १६
माझ्या तोरणमाळच्या आभाळी
सूर्यदेव रोज येतो हो... मस्त
डोळियासी नवनवे दिसे
सूर्योदय अन् सूर्यास्त १७
ये रे दोस्ता ... एकदा तू !
पहा कीऽ माझे तोरणमाळ
तू ह्रदयी घे रे साठवून
प्रेम जिव्हाळा सकळ १८
कवी :-
प्रा.पुरूषोत्तम पटेल, मु.पो.म्हसावद
ता.शहादा,जि.नंदुरबार, 425432
भ्रमणध्वनी - 8421498724
Blog-mhasawad. blogspot. In
patelpm31@gmail.com
खूप छान सरजी
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद सरजी!🙏
हटवाशुभ सकाळ 🌹🙏🙏🙏
खुप सुंदर रचना केली आहे ...सर 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद जी!🙏
हटवातोरणमाळ 👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी 🙏
हटवाखुपच भारी...!!
हटवावाहहह...खुप सुंदर काव्यात्मक वर्णन तोरणमाळच, छान लिहीलय...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवामनापासून आभार मॅडम!🙏
हटवावा बहुत खूब.
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवावा खूपच सुंदर काव्य.
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद
हटवाअप्रतीम रचना 👌
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवाVery nice sir
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद!🙏
हटवातोरणमाळ इतकीच सुंदर कविता
उत्तर द्याहटवाफारच सुंदर..👌👌👍
उत्तर द्याहटवाहूबेहूब तोरणमाळ आलं सरजी डोळ्यासमोर अतिशय अप्रतिम रचनाविष्कार 👌👍👌
उत्तर द्याहटवावा , सर खूप सुंदर वर्णन केले रचनेतून👌👌👌👌
उत्तर द्याहटवावाह खुप छान तोरणमाळ ठिकाण मस्त काव्यात गुंफले
उत्तर द्याहटवाव्वा..व्वा.. अतिशय सुंदर वर्णन तोरणमाळचं👌👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवावा! सरजी,काव्यातून किती छान तोरणमाळचे निसर्ग वर्णन केले आहे
उत्तर द्याहटवा🏞️🏞️🌳🌳🌺🌺
विजय बोरदे
अतिशय सुंदर काव्यरचना👌👌🎊🎉💐🙏👍
उत्तर द्याहटवा