Kaayguru.Marathi

गुरुवार, ऑक्टोबर २२, २०२६

आईच्या हातचा गाजर हलवा!


आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली

आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली!

साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला

किसलेल्या  गाजराचा  केसरी रंग  बहरला !

साखर विरघळली जणू दुधात स्वप्न मिसळले

हलव्यावर काजू-बदाम आईने अलगद पेरले!

चमच्याने हलवता माझ्या आठवणी बहरल्या

बालपणीच्या  हट्ट लेऊन त्या बोलू लागल्या !

एक घास घेता पोट अगदी तुडूंब भरून आले

आईच्या हातचे हलवे  अमृताहून गोड झाले !


©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”

Mhasawad.blogspot.com

आईच्या हातचा गाजर हलवा!

आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या  गाजराचा  ...