सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र. ५७
विषय- लोकं काय म्हणतील?
सूचक- सौ.राजश्री जाधव,पुणे
दि.१४/०९/२०२५
-----------------------------------------------------------
लोकं काय म्हणतील?[कविता]
लोकं काय म्हणतील
मला नाही घेणं देणं
सखे,मी फक्त जाणतो
आपलं प्रेम निभवणं!
सखे,तुझं सोबत येणं
माझ्यासाठी परिसस्पर्श
तुझ्या एक एक शब्द
जगण्याला देतो हर्ष!
सखे,तू गंध फुलांचा
करिते प्रसन्न तन मन
नको घाबरु ग् जगाला
तू राधा मी मनमोहन
सखे,मी तुझ्या प्राजक्त
तू तर माझी चाफेकळी
सखे, मिठीत ये ना तू
चांदण्यात या तरुतळी
©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेंन म.पटेल " पुष्प "