Kaayguru.Marathi

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

खरंचं...गडे !



आज नवरा म्हणे बायकोला
झाला का ग्ं स्वयंपाक
नसेल झाला तर जाऊ
हॉटेलात जेवायला झाऽऽक !😊

खरंच गडे तुम्ही बोलला
हे कसं सुचलं हो आज ?
सांगा ना गडेऽऽ मला 
दिलदारपणाचं राज !😏

साठी उलटली तरी कधी
सोबत नेलं नाही फिरायला
वेडबिड तर नाही ना लागलं
ह्या माझ्या कंजुस नव-याला 🤔

तो कानाजवळ जाऊन
हळूच काही तरी बोलला
ऐकताच मात्र ती तर
लागली चक्क नाचायला💃

खरंच का हो संसारात
वाढत्या वयात असं घडतं ?
म्हातारे होता होता कोणी
बायकोच्या प्रेमात पडतं ?🤭

अगं,आजपर्यंत तू फक्त…
घरातली कामं करित राहिली
रांधा वाढा अन् उष्टी काढा
स्वतः यातच अडकवत गेली😘

रोजच्या जगण्यात विसरलो 
प्रेमाच्या गुलूगुलू गप्पा आपण
म्हणून डिनर  घेतांना चघळू
पहिल्या दिवसाची गोड आठवण😄

घरात पोरं आणि सुना आल्या
सरली मग आपली प्रायव्हसी
चऽऽल  घराबाहेर लुटू आपण
आपल्या तरुण मनाची वीसी🥰

पोरं आणि सुना आपल्या
बघ,संसारात रमलेत छान !
आत्ता आपणही करु मौजमज्जा
मैं तेरा राजा तू मेरी जान…!😋

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
              म्हसावद

१६ टिप्पण्या:

  1. क्या बात...... क्या बात है

    बहोत खुब 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम रचना.... नवरा बायको मधला संवाद खूप छान मांडला आहे..👍👌✍️🍫🌹

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर,आणि वास्तविक रचना केली आहे सर,संसाराचे बघता बघता दोघांसाठी वेळच उरत नाही.👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...