Kaayguru.Marathi

बुधवार, जून ०३, २०२६

जुनी सायकल

जागतिक सायकल दिनानिमित्त काव्यरचना !
आज अडगळ साफ करतांना
दिसली मला जुनी सायकल 
म्हणाली,आठवले का ते दिवस?
अरे,बघतोस काय? फिरायला चल!

अरे...पंचवीशीत तर तू दिसायचा
सडपातळ राजबिंडा अन् सुडौल
आता माझ्यापासून दूर गेल्यावर 
बघ,दिसतोय जाडजूड रोलम् गोल! 

तू दोन पायांचा मला दोन चाकं
माझ्या सीटवर मार तू फतकल 
जाऊ रेऽऽ दोघे मस्त फिरायला
तू मार ना गड्या माझे पायडल!

सहा महिने कर तू माझ्याशी
पुन्हा लई भारी दोस्ती मस्तवाल
उतरवून देईन मी शरीर तुझे
नक्की देईन तुला हरीणाची चाल!

सकाळ सायंकाळच्या सफरसाठी
दररोज दोन किमीने वाढव चाल
अरे,जरा व्याधी धुमऽऽ पळेल 
तुझे तन-मन होईल मालामाल!

कान देऊन ऐकत होतो मी
जे शब्द बोलत होती सायकल
पटलंय ग् बाई,आरोग्यम् धनसंपदा!
करतोय मी गट्टी...फिरायला चल!

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म्.पटेल " पुष्प"


Mhasawad.blogspot.com

आईच्या हातचा गाजर हलवा!

आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या  गाजराचा  ...