Kaayguru.Marathi

शनिवार, ऑक्टोबर ३०, २०२१

गाव माझा

गाव माझा 💎

प्रिये,  गाव   माझा    टुमदार  
येऊन  तर  पहा   तू   एकदा 
इथले  नदी  वृक्ष   पाखरं 🐦 
होतील  ग्   तुझ्यावर  फिदा 

तापी - वाकी गोमाई सरिता 
गाव  परिसराच्या भाग्यदाता
सुजलाम्   सुफलाम्  करीती
बळीराजाला या तिन्ही माता 

इथली  काळी कसदार माती
गोड   गोड  जपते  ग्   नाती 
केळी पपई गोड ऊसाचे मळे 
अन्  कापूस  भासे श्वेतमोती

रानातल्या   येता जाता वाटा
चढणी-उतरणी अन् नागमोडी 
त्यावर चालतांना   भासशील   
तू  तर  मनमोहक  गुलछडी ! 

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 

२३ टिप्पण्या:

  1. गावाचंखूपच सुंदर वर्णन केले आहे 👌👌👌👌🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर रचना... छान वर्णन केलं आहे गावाच...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  3. छान वर्णन सर, टुमदार गावाचं टुमदार वर्णन 👌👍🚜🚜🏕️🏕️🛕🛕
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा
  4. काव्य वाचन करताना गाव डोळ्यासमोर उभा राहिले.सुंदर रचना.

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...