Kaayguru.Marathi

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

सुगरण

    सुगरण (कविता)
कधी शिकशील माणसा
सुगरणीची  तू  रे  कला
झाडावर  बांधीला  सुंदर
पिलांना  झुलता  बंगला

तिला  नाही   दोन  हात
ना  कोणी  रे  सोबतीला 
बघ   ईवलुश्या   चोचीने
खोपा   अविट   विणला

तिला   माहित  ना  माप
इंच   मिटर   अन्    फूट
बांधते  नाजूक  फांदीला
खोपा किती सुंदर अतूट

तीन   इंचाचा   हा  पक्षी
काडी  गुंफितो   दिसभर
पिला  आयुष्य   द्यावया
जीव   टांगतो  शेंड्यावर

मुठभरीचा  हा  रे  जीव
माया  ममतेला  चांगला
पिला  वाटते  ना  भिती
निजे बिनघोर खोप्याला

© प्रा.पुरुषोत्तम पटेल 
          " पुष्प "

२३ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर कल्पनाविष्कार , सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम शब्द रचना, सुंदर काव्य गुंफण 👍👍👍

    उत्तर द्याहटवा
  3. सरजी,सुगरण पक्षाची कलागारी सुंदर शब्दांत वर्णन केली...!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. निसर्गाचा सूंदर आविष्कार व्यक्त केला

    उत्तर द्याहटवा
  5. खुप सुंदर रचना अप्रतिम 👌👌👌✍️✍️

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...