आज एक ऑक्टोबर... जेष्ठ नागरिक दिवस ! आज समाजात जेष्ठ नागरिकांना अनेक कुटुंबांत घृणास्पद वागणूक देण्याचे प्रकार दैनिकातून व दूरदर्शन वरील बातम्यांतून वाचायला-पाहायला मिळतात.हे निंदणीय आहे.शासनाला जेष्ठांचे अधिकार सुरक्षित राहावे.त्यांना माणूस म्हणून जगता यावे.यासाठी कायदे करावे लागावे.यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते ? ज्येष्ठांचा प्रत्येकाने मान-सन्मान राखावा.कारण शिरवाडकरांनी म्हटले आहे…
" आजचे प्रत्येक हिरवे पान …
हे उद्याचे पिवळे पान आहे ! " ही जाणीव प्रत्येकास व्हावी या किमान अपेक्षेने लिहिलेली ही एक कविता !
आज जेष्ठ नागरिक दिन
दिनांक असे एक ऑक्टोबर
मी वंदन करीतो तुम्हा
जोडूनी माझे दोन्ही कर
जेष्ठ तुम्ही आमूचे दैवत
राखीन मी तुमचा मान
संस्कार गंगोत्री मज जणू
सदैव करीन मी सन्मान
विनंती एकच करु नका हो
तारुण्याचा कणभर गर्व
आजची हिरवी पाने
होई उद्याला पिवळीजर्द
जेष्ठ सहवासाचा लाभ
मिळे भाग्यवंता घरा
युगे अठ्ठाविस उभा राहिला
जगजेठी पुंड्याचा दारा
जेष्ठ आजी आणि आजोबा
नातवांची जणू गीता-गाथा
आज शत शत नमन तुम्हा
कृतज्ञ चरणी ठेवितो माथा!
एक विनंती सकलांना
नका विसरु जेष्ठांचे श्रम
सोने-चांदीचा निर्मिला तरी
नका दावू हो वृद्धाश्रम !
© प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्षम् "
म्हसावद
वा खरोखर खूप सुंदर रचना केलीत सर आणि खर आहे आज जे काही हे आपण आयुष्य जगतो आहे आणि आयुष्यात खूप गोष्टींचा उपभोग घेतोय शिवाय बऱ्याच गोष्टींचा अनुभव सुद्धा घेतोय पण त्याची खरी सुरुवात तर आपल्या पूर्वजांनी पासून झालेली असते त्यामुळेच खरंच कधीच ज्येष्ठांचा आपण अपमान तर करू नयेच परंतु कायम त्यांना आदरपूर्वक वागणूक देऊन त्यांचा सांभाळ करावा.🙏🙏🙏🙏🙏 खूप सुंदर आणि अप्रतिम शब्दात तुम्ही भावना व्यक्त केल्यात 👌👌👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐✍️✍️✍️✍️✍️✍️💐💐
उत्तर द्याहटवामॅडमजी,बाबांचे वय वर्षं ९५...! प्रकृती बिलकूल ठणठणीत आहे. आज मी जे सुख अनुभवतोय ते केवळ त्यांच्या पुण्यकर्मानेच ! त्यांचा आदर हा माझे हृदयस्थ कर्तव्यच ठरते.🙏🙏🙏आज जेष्ठ नागरिक दिनानिमित्त त्यांना काव्यरचनेतून प्रणाम !🙏🙏🙏
हटवाआपण सुंदर समिक्षा दिलीत.आपले मनापासून खूप खूप आभार!🙏🙏🙏
अतिशय सुंदर रचना केली सर, खरोखर आपल्या ज्येष्ठांचा खूप आधार असतो. एकत्र कुटुंब पद्धती खरे तर सुखी कुटुंबाचा पाया आहे. पण दुर्दैवाने माणसाला समजत नाही आणि आपल्या मात्या पित्यांचा अवमान केला जातो. हे कुठे तरी थांबले पाहिजे. खूप सुंदर रित्या तुम्ही तुमचे विचार मांडले आहे.
उत्तर द्याहटवामॅडमजी, मनापासून आभार!🙏🙏🙏
हटवानिःशब्द....
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर रचना केली सर,आपल्या जन्मदात्या,व वडीलधारी माणसाचा सदैव असाच मान हवा 👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏
उत्तर द्याहटवामाणसासी...जेष्ठत्वाची जाणीव संस्कारी पाहिजेसी.
उत्तर द्याहटवाहेची जगणे त्यासी माणूस म्हणून जगण्यासी अर्थ कळलासी...असा सकल पुरोषोत्मम पुरूष जन्मलासी धन्य तेची माता पिता पटेल घराण्यांसी....!!
आपले संस्कार हेच आपले वैभव...!!
खूपच सुंदर अप्रतिम भावना...!
खूप खूप शुभेच्छा 💐
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा 🙏.
खूप खूप सुरेख रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा