Kaayguru.Marathi

सोमवार, ऑक्टोबर २५, २०२१

बा...विठ्ठला !

विठ्ठला   केशवा  विठूराया  पंढरीनाथा
रुप   तुझे  पाहतो  चरणी  ठेवून  माथा

मूर्ती  तुझी  सावळी   गोलटोपी   शिरी
प्रसन्न  वदन   बरवे  दुःख   हरे  श्रीहरी

देवा  कानी  शोभती  लंब  मकरकुंडले 
मन  माझे  स्थिर  करी  दोन  कर्णफुले

कपाळी  तृतीय  नेत्र  वरी  चंदन टिळा 
कंठी  कौस्तुभमणी गळा तुळशीमाळा

वाम वक्षी  खळगी नाम श्रीवत्सलांछन
उजवे वक्षी वर्तुळखंड नाम श्रीनिकेतन

दोन  बाहूवरी  बांधियेले  दोन बाजुबंद
वरदायी  दोन  मनगटी  शोभे  मणीबंध

देवा, देखीले मी डोळा तुझे करकटेवरी
उभा दिसे  मज अठ्ठावीस युगे  वीटेवरी

तुझा  वाम हस्ती भासे  पांचजन्य शंख
उजव्या  हाती  धरीले तू  मोहक पंकज

रुप   तुझे  केशवा पाहिन  जन्मोजन्मी
नको  देऊ अंतर  तुझा भक्तांसी दे हमी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

३६ टिप्पण्या:

  1. वाहहह...खुप सुंदर भक्तीमय रचना...अप्रतीम शब्दांकन...👌👍💐🍫

    🙏जय हरी विठ्ठल🙏

    उत्तर द्याहटवा
  2. सरजी,श्रीविठुरायाचे रुपदर्शन अप्रतिम शब्दांत वर्णिले!✍️👌👌👌
    जय जय पांडुरंग हरी!🌹🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🛕🛕🛕
    सुंदर भक्ती गीत सरजी
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा
  4. पंढरी पंढरी विठुरायाची नगरी👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  5. सुंदर रचना सर अप्रतिम .👌💐

    श्रीमती योगिता पटेल .

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...