Kaayguru.Marathi

शुक्रवार, सप्टेंबर २५, २०२६

एका झाडाची गोष्ट!

अंगणात लावलेल्या कडुनिंबाची
ऐका  सांगतो  मी गोष्ट  छान !
रणरणत्या उन्हात देते सकला 
गार  गार शितल  हवेचे  दान !

येता नववर्ष उत्सव गुढीपाडवा 
फुलते चैत्रपालवीने पान न् पान
चांदणफुलाचा दशदिशा सुगंध
जणू धरित्रीला देतो श्वासाचे दान!
अंगणात लावलेल्या कडुनिंबाची
ऐका  सांगतो  मी गोष्ट  छान !

सकाळी घ्यावीत अनशापोटी 
तोंडात चघळायला पानं चार !
रक्तशर्करा ठेवी ते  नियंत्रणात
आरोग्य लाभे व्याधीं होई हैराण 
अंगणात लावलेल्या कडुनिंबाची
ऐका  सांगतो  मी गोष्ट  छान !

केसात  होता कोंडा अन् खाज
दूर  करायला  टाळुचे संक्रमण 
वैद्यकीय सल्ल्याने घेत रहावे
नित्य सकाळी कडुनिंबाचे पान !
अंगणात लावलेल्या कडुनिंबाची
ऐका  सांगतो  मी गोष्ट  छान !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प "

सोमवार, सप्टेंबर १४, २०२६

कलाधिपती

बाप्पा  मोरया  रे मोरया तू  सृष्टीचा  मंगलमूर्ती
वंदन  तुजला  प्रथमेशा तू सकलांचा अधीपती

देवा  तूच  रे सुखकर्ता  आणिक  गणांचा ईशा
कोटीसूर्य तेजे उजळती अखिल विश्वाचा दिशा

देवा तूच रे बुद्धीदाता चौसष्ट कलांचा अधिपती 
तूच दावीसी चौदा विद्या देवा झाला कलाधिपती

मुषकावर बैसोणी देवा  ब्रम्हांड  तूच  रे तारितो 
भक्तवत्सल  होऊन  तू  दैत्य,असुरासी  वधीतो 

शिवशक्तीसी वंदून देवा केल्या प्रदक्षिणा तू तीन
ब्रम्हदेव  कृपा हस्ते  मिळाला पुजेचा आद्य मान

देवा  तूच  रे  सुखकर्ता अष्टविनायक  तू जगती

गणांचा होऊन नायक अमृत नाम तुझे गणपती !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"

Mhasawad.blogspot.com

आईच्या हातचा गाजर हलवा!

आईने  गाजरं  किसली अन् प्रेमाने भिजली आज थंडीच्या पहाटे चुलीवर कढई सजली! साजूक तुपाचा सुगंध जणू घरभर दरवळला किसलेल्या  गाजराचा  ...