Kaayguru.Marathi

गुरुवार, ऑक्टोबर २१, २०२१

माझी शाळा (कविता)


म्हसावद, ता.शहादा येथील कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यामंदिर विषयी कविता

माझी   शाळा 

माझी शाळा लळा लाविते बाळा
उपदेशाचा गोड गळा संजीवनी मज शाळा 


ज्ञान सेवा तू साफल्यम् ब्रिद असे हिचे थोर
ज्ञानियांचे जणू माहेर गाव म्हसावद शाळा कुबेर


थोर येथे गुरु परंपरा प्रितीची सदा वाहे धारा
जातीभेदासी नसे थारा समता पेरीतसे वारा


दूर करिते अज्ञान सकलां करीते सज्ञान
सांदिपनी जणू वरदान भासे सद्गुणांची खाण


चहू दिशी वृक्ष सावली दिनांसी शोभे माऊली
या रजकणांची धुळी शिष्य लाविती भाळी

            
कर्तृत्वाला देई मान अभ्यासाला मोठ्ठे स्थान
कुणी न् मोठा कुणी न सान शिकवी हा मंत्र महान


अशी ही धन्य धन्य माझी कुबेर शाळा
दोन्ही कर जोडून माझे कोटी प्रणाम

शब्दसौदर्य :प्रा.पुरूषोत्तम पटेल
उपमुख्याध्यापक,
कुबेर हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद, ता.शहादा


२५ टिप्पण्या:

  1. खूप समर्पक कवीता आज मी शाळेच्या अहवाल वाचनात याचा उपयोग केला .थँक्स 👌👌🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद मॅडम, माझ्या कवितेला न्याय दिला. व जनमानसात स्थान दिल्याबद्दल आभार!

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर कविता आणि तुमची शाळा कवितेतून प्रकट झाली.👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. छान भावना व्यक्त केल्या सरजी, कविता वाचून आपल्या शाळेचे दिवस आठवतात 🙏🙏🙏🙏
    व्ही.एम.बोरदे

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

श्रीशिवस्तुति

  shivastutiश्री शिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण ता...