नवरात्री मग ती वासंतिक नवरात्र असो वा शारदिय नवरात्र. दुर्गा मातेच्या प्रत्येक रुपाचे, प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे. दुर्गा मातेची प्रत्येक रुपं तिच्या वेगवेगळ्या शक्तींसाठी ओळखली जातात.
आईला कमल आणि शंखपुष्पीची फूल अर्पण करावे. ❤️आज चैत्र नवरात्रीच्या तिसर्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते . भाविक या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा करतात.देवीला कमल आणि शंखपुष्पीची फूल अर्पण करतात. देवीच्या कपाळावर घंटाच्या स्वरुपात अर्धचंद्र सुशोभित आहे ज्यामुळे देवी उपासना करणा-या भक्तांच्या चेहर्यावरील तेज वाढतं. म्हणून या देवीला चंद्रघंटा म्हणतात.चंद्रघंटा देवीला कमल आणि शंखपुष्पीचे फूल अर्पण करावे. आज तिसऱ्या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
तसंच देवीला दूध किंवा दूधापासून तयार केलेली मिठाई किंवा खीरीचा नैवेद्य ठेवावा. यामुळे आई आपल्या भक्ताला प्रत्येक कामात यश मिळवून देते.नवरात्रीचा
तिसरा दिवस दुर्गा देवीच्या चंद्रघंटा रूपाला समर्पित असतो. या दिवशी पूजा करताना भक्तांनी तपकिरी रंगाचे कपडे घातले तर आई चंद्रघंटा प्रसन्न होते.
चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते. दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरुप कल्याणकारी आहे. चंद्रघंटा देवी दशभुजा आहे.चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह आहे. या रुपात देवीला दहा हात आहेत. देवीच्या हातात कमळाचे फूल, धनुष्य आणि जपमाळ आणि बाण आहेत. उर्वरित हातांमध्ये त्रिशूल, गदा, कमंडल आणि तलवार आहे. आईचा पाचवा हात अभय मुद्रामध्ये राहतो. देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे.
❤️ चंद्रघंटा देवीचे पूजन
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करावे. चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केल्यास उत्तम. तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये खीर, बर्फीचा आवर्जुन वापर करावा, असे सांगितले आहे. याशिवाय देवीला मध अर्पण करावा,
❤️ चंद्रघंटा देवीचा मंत्र
चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पुढील मंत्र म्हणावा.
" पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:।।"
❤️ चंद्रघंटा देवीची महती
असे सांगितले जाते की, भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली.या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात, असे मानले जाते.आज तिसऱ्या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
❤️ देवी चंद्रघंटाची पूजा कशी करावी :-
देवी चंद्रघंटाची मूर्ती असल्यास खूपच उत्तम.पण देवीची मूर्ती नसल्यास फोटोला एका पाटावर ठेवा. त्यानंतर विधीवत देवीची पूजा करा. देवीला कुंकू, अक्षता, धूप, पुष्प आणि दूधापासून तयार केलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर देवी चंद्रघंटाच्या आराधनेसाठी
“ ऊं देवी चंद्रघंटायै नम: ” या मंत्राचा जप करा. तसेच, दुर्गा चालीसा म्हणावा. दुर्गा आरती केली तरी देवी भक्ताला पावते.
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
किती सुंदर आणि उपयुक्त माहिती 🙏🙏👌👌👌
उत्तर द्याहटवाछान 👌👌👌
उत्तर द्याहटवाछान माहिती.... 👌👌
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌 माहिती
उत्तर द्याहटवाअतिशय उपयुक्त माहितीपूर्ण लेख सरजी अप्रतिम लेखन ✍️✍️👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर माहिती👌👌👌
उत्तर द्याहटवाउत्तम माहिती
उत्तर द्याहटवाखुप छान माहिती दिली आहे सर 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाछान माहिती दिलिय सर....🙏👌👍✍️🍫🌹
उत्तर द्याहटवाखुप सुंदर आध्यात्मिक व उपयुक्त माहीती दिली आपण सर...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती सर जी👌👌👌👍
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा