देवा... माझा एकेक श्वास
तू दिलेली अप्रतिम भेट !
कृतज्ञ मी जपीन हृदयात
गाईन तुझे अमृतगाणे थेट!
देवा...चालतो मी तुझा बळे
जाणीव मला तू माझ्या श्वास
जिथे जातो तेथे मज होतो
अनंत रुपात तुझाच भास !
देवा... तुज पाहतो रेऽऽ मी
प्रतिदिन पंचपंच उष:काली
पानात फुलात किरणात जलात
पाऊसाचा धारात संधीकाली !
प्रभो ! दयाघना मागणे एक
सदैव असावा तू माझा सांगाती
विसर न व्हावा तुझा कधी
हात घ्यावा हाती दे सन्मती !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाजय जय रामकृष्ण हरी!🌹🙏🙏🙏
सुंदर
उत्तर द्याहटवा,...... ओमं साई राम.......🙏🙏🙏👍👍👍👍👍
उत्तर द्याहटवा🙏🙏
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवाAtishay sunder rachna 👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा...! अतिशय सुंदर भावपूर्ण रचना 👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा