Kaayguru.Marathi

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

बायको नावाचं पुस्तक

बायको नावाचे पुस्तक (कविता )

मित्रहो,बायको...अत्यंत संवेदनशील विषय. " बायको " ही प्रत्येक नव-याची अंतर्मनाची प्रेमळ हाक आणि मदतीची साद असते.तिच्याविषयी प्रेमाच्या गोष्टी जशा हृदयात साठवतो न् आपण ; तशाच  कडू गोष्टीही आपल्याच हृदयात जतन कराव्यात.कोणाशीही हा " ओटीपी " कधीही शेअर करु नका.[हीच जाणीव बायकोने ही ठेवावी  !]


बायको नावाचं पुस्तक 
आजन्म जपावे मनात
संसारातील छोटी मोठी गोष्ट
निरंतर जपावी हृदयात

बायको नावाच्या पुस्तकांची
पाने फाडू नये चारचौघात
कडू असो वा गोड आठवण
निरंतर जपावी आपण हृदयात

असावी प्रेमळ अतिसुंदर
छबी नवरोबाच्या मनात
दोघांत दिसू नये कधी अंतर
दिसावी एकमेकांच्या हृदयात

दोघांची जोडी जणू शोभावी
लक्ष्मी-नारायण जनात
कणभरही संशयाला नसावी 
जागा नवरोबाच्या हृदयात

बायको स्रित्वाचे एक दैवी रुप
ती तर नवदुर्गा सप्तखंडात
प्रसन्न वागा प्रतिदिन तिच्याशी 
क्लेश ठेवू नये हृदयात

बायको म्हणजे संसाराची 
फुलणारी पुष्पलता सुगंधित
जपावा तिच्या शब्द नवरोबाने
गीता वेद समजून हृदयात !


© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

४२ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर विचार मांडले आहेत सर... खरचं बायको नावाच्या पुस्तकाचं महत्व वाचल्याशिवाय समतशजतच नाही..!!

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा व्वा सरजी अप्रतिम भावनिक रचनाविष्कार 👌👍👍

    उत्तर द्याहटवा
  3. सरजी...अप्रतिम भावना लिहिली आपण...!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...