💎 देवी स्वरुप- सिद्धिदात्री 💎
शारदीय नवरात्र (ऑक्टोबर २०२१) मधील आजच्या नवव्या नवदुर्गेचे स्वरुप सिद्धदात्री...नवव्या माळेला देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते. अश्विन/शारदीय नवरात्रीची सांगता विजयादशमीने होते. आज नवदुर्गा देवी स्वरुप हे सिद्धिदात्री देवीच्या स्वरुपात आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या पृथ्वीतलावर संचार असल्याचे म्हटले जाते.
💎 कमळावर आरूढ सिद्धदात्री देवीचे स्वरुप
दुर्गा देवीचे नववे स्वरुप म्हणजे सिद्धिदात्री देवी. सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरुपाला
" सिद्धिदात्री " असे संबोधले जाते. सिद्धिदात्री देवी
भगवान विष्णूची प्रियतमा देवीलक्ष्मी प्रमाणेच कमलपुष्पाच्या आसनावर विराजमान आहे. देवी मधुर व गोड स्वरांनी आपल्या भक्तांना वरदान प्रदान करते. सिद्धिदात्री देवी सिंहावर स्वार असून चतूर्भूज आहे. एका हातांमध्ये कमळ,दुस-या हाती शंख, तिसऱ्या हातात गदा, आणि चौथ्या हातात सुदर्शन चक्र धारण केले आहे. सिद्धिदात्री देवी सरस्वती देवीचेही एक रुप मानले जाते. देवीने श्वेत वस्त्र परिधान केल्याने तिचे स्वरुप अधिकच मनमोहक भासते.म्हणून देवीला " प्रसन्न वदना " असेही म्हणतात. सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त होते, अशी भक्तांची श्रद्धा व मान्यता आहे.
💎 अर्धनारीश्वर
१) अणिमा, २) महिमा, ३) गरीमा, ४) लघिमा, ५) प्राप्ती, ६) प्राकाम्य, ७) ईशित्व आणि ८) वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. देवी पुराणात वर्णन मिळते की, भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे भक्त श्री शंकराला ''अर्धनारीनटेश्वर '' या नावानेही ओळखतात.
💎 मंत्र
वन्दे वांछित मनोरथार्थ चन्द्रार्घकृत शेखराम्।
कमलस्थितां चतुर्भुजा सिद्धीदात्री यशस्वनीम्॥
💎 देवी सिद्धिदात्रीचा ध्यान मंत्र
सिद्धगंधर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि ।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी।।
💎 सिद्धिदात्री देवीचे पूजन
असे म्हणतात की, नवव्या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा ऋषि-मुनि, साधक, यक्ष, किन्नर, देवता, दानव आणि गृहस्थाश्रमी जीवन व्यतीत करणारे सांसारिक स्री-पुरुष पूजन करतात.देवीची पूजा व व्रत ठेवल्याने व्यक्तीला यश, धन आणि बलाची प्राप्ती होते.
सिद्धिदात्री देवीचे पूजन करतांना नऊ प्रकारची फुले अर्पण करावे. नऊ जातीची फळ,आणि नऊरसांनी युक्त प्रसादाचा देवीला नैवेद्य दाखवून तो प्रसाद द्यावा.असे केल्याने भक्ताला धर्म, अर्थ,काम,मोक्ष या चार पुरुषार्थाची प्राप्ती होती.
💎 व्रताची सांगता आणि महत्त्व
देवीच्या पूजनाने यश, बल आणि धन प्राप्ती होते, असे म्हटले जाते. देवी आपल्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, असे सांगितले जाते. तसेच नवरात्राची सांगता सिद्धिदात्री देवीच्या पूजनाने होत असल्यामुळे काही ठिकाणी या दिवशीही कुमारिका पूजन करण्यात येते.कुमारिका पुजनानेहीही अनन्य साधारण फळप्राप्ती होते. ९ हा अंक देवीच्या नऊ रुपांचे व नऊ शक्तीचे द्योतक असल्याने या दिवशी ९ कुमारिकांचे मनोभावे पूजन, मान-पान करावे .तसेच भैरव रुपात एका बालकाचीही
पूजा करावी. आणि नवरात्रीच्या विशेष व्रताची सांगता करावी, असे सांगितले आहे.
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
किती सुंदर आणि उपयोगी माहिती देत सर तुम्ही 👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिलीत 👌👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती दिली सर👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर माहितीपूर्ण,लेख .. नेहमीप्रमाणेच... खुप खुप धन्यवाद सर...������♀️������
उत्तर द्याहटवासर जी आपण नेहमीच सुंदर माहिती सादर करतात..व्वा..👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप मस्त रचना
उत्तर द्याहटवानवरात्रीची अप्रतिम माहिती सादर केली सरजी खूपच उपयुक्त माहिती 👌👌
उत्तर द्याहटवा।। जय माता दि ।।🌹🌹🌹🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान माहिती दिली आहे सर 👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती दिली सर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवा