Kaayguru.Marathi

गुरुवार, ऑक्टोबर १४, २०२१

कळी (हायकू )

आठवणीची
कळी हो उमलली
फूल ती झाली
भावार्थ :- कळीची फूल झाल्याचे पाहून अतिव आनंद होतो.तशा सुंदर आठवणी मनाला प्रसन्नता देतात.व त्या आठवणीत आपण हरवून जातो.
पसरे गंध
दशदिशांना मंद
वारा ही धुंद
भावार्थ :- फुलांचा गंध दशदिशांना मंद मंद पसरतो.वाराही धुंदीत न्हाहतो.तसेच आठवणीं ताज्या झाल्या की मनाला धुंद करुन तजेला देतात.
झाला सूर्यास्त
आली कातरवेळ
स्मृतींचा खेळ
भावार्थ:- सूर्यास्त झाला की, कातरवेळ होते.ही कातरवेळ मोठी जीवघेणी.नको त्या स्मृती जीवंत करते.प्रेमात अडचणी आणणा-या व्यक्ती अनेकदा आपलेच प्रियजन असतात.पण,प्रेमात ब-याचदा तेच दुरावतात.ही स्मृती मन विषण्ण करुन जाते.

 © प्रा.पुरुषोत्तम पटेल   " पुष्प "

२२ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर रचना आणि त्याचा भावार्थ 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. वाहहह खुप सुंदर हायकु....व छान भावार्थ सांगीतलाय...��������

    उत्तर द्याहटवा
  3. व्वा व्वा अप्रतिम हायकू रचना आणि भावार्थ सांगितला सरजी ✍️👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...