मधुचंद्राची...
हुरहुर ती भेटीची
एकमेकांच्या मिठीत येण्याची
सरिता मिळे सागराला
तशी समर्पणाची…
होती अबोल शांत शांत
डोक्यावरती लफ्फेदार पदर…
अन् बावरलेली नजर
गुलाब फुलांच्या लडी
बसली होती कुरवाळत...
सप्तरंगी फुलांची रांगोळी
पलंगावरती विखुरलेली
कुंतलातील मोग-याचा गंध
दरवळ खोलीभर…
स्पर्श होताच ती
शहारली...अनाहूत लाटेसारखी
न कळे दोहोंना बेधुंद
बुडाले प्रेमसागरा आकंठ…
श्वासाश्वासाला भारुन गेला
रातराणीचा मधुगंध
शहारले रोमरोम अन्
उधानले तन-मन...
हरपले अवघे देहभान ...
अन् चंद्रही लाजला,रात्रीला
चोरुन...होता साक्षीला !
भूप राग पहाटगाणी !
वाराही आळवित आला
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम सुंदर
उत्तर द्याहटवाआभारी सरजी!🙏
हटवाखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे मनाला धुंद करणारी कविता आहे
उत्तर द्याहटवाआभारी जी!🙏
हटवाअप्रतिमच ...सुंदर 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवासचीनजी,आपले आभार!🙏
हटवाबेधुंद काव्यरचना 👌🏻👌🏻👌🏻👏👏👏
उत्तर द्याहटवारंजुजी... अप्रतिम समिक्षा! आपले मनापासून आभार!🙏
हटवाअप्रतिम शब्दगुंफन केली सरजी ✍️🌟🌟 🌟
उत्तर द्याहटवाआपले आभार!🙏
हटवाअप्रतिम काव्य रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌👌🙏🙏
हटवाआभारी मॅडम!🙏
हटवाआभारी मॅडम!🙏
हटवाअप्रतिमच 👌👌👌
उत्तर द्याहटवाआभारी मॅडम!🙏
हटवाखूप खूप सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना
Khupch सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना सर...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवासुंदर रचना
उत्तर द्याहटवा