Kaayguru.Marathi

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

रुप-स्वरुप

रुप-स्वरुप (कविता)

शोना, क्षणभर पाहता तुला
तू माझा हृदयात केले घर
आता तर शक्यच नाही ग्
तुझ्याविना दूर राहणं क्षणभर

राणी सांगतो मी तुला ऐक !
क्षणात मनात ठसते ते रुप
विचारांना समजून घेऊन 
डोळ्यात साठते ते स्वरूप

प्रिये, तुझ्यासोबत ग् संचार
जीवनात भासे वसंतबहर
तुझ्या एक एक शब्द जणू 
श्वासात भरे संजिवक लहर

सखी,तू तर झाली ग् माझा
संसाराचा कणखर आधार
शब्दच सापडत नाही मला
कसे मानू मी तुझे आभार!

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

 

२९ टिप्पण्या:

  1. वाहहह...खुप सुंदर व्यक्त झालात सर... छान लीहीलय.. ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  2. सरजी,रुप आणि स्वरुप यातील सूक्ष्म भेद सुंदर शब्दांत वर्णन केला!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. मनाला भावलेले ह्रदयस्पर्शी काव्य, अप्रतिम सर👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...