Kaayguru.Marathi

गुरुवार, मार्च ०५, २०२६

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित 
सगळे सारखे दिसतात
आपला परका कोण ?
ओळखतांना फसतात

रंगोत्सव म्हणे लोकांना
माझ्याशी करा दोस्ती
विसरुन जाल तुम्ही...
जात धर्म पंथाची मस्ती!

काळा असो वा गोरा
मला सगळेच सारखे !
सगळ्यांना चिकटतो मी
राहू देत नाही मी परके 

माणसा घे माझा गुण
समृद्ध होईल जीवन
रंगवून घे तनामनावर
माणुसकीच्या प्रत्येक क्षण!

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल " पुष्प "


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...