Kaayguru.Marathi

शुक्रवार, ऑक्टोबर २२, २०२१

अंगाई गीत

अंगाई ✍️
हातांचा करुनी पाळणा
ओढिते ममतेची दोरी
निज निज माझ्या बाळा
गाते तुला मी अंगाई ।।धृ।।

परतुनी आल्या गोठ्यात गाऊ
खोप्यात निजले चिऊ अन् काऊ
सवे खेळाया नाही कोणी
निज निज माझ्या बाळा 
गाते तुला मी अंगाई ।।१।।

नारायण गेला नारायणी
झाले शुभं करोती म्हणोनी
अंगणी झगमगे काजव्यांचा वाती 
निज निज माझ्या बाळा
गाते तुला मी अंगाई ।।२।।

गगनी चांदोबा उगवला 
चांदणं रांगोळी स्वागताला
निद्राराणी आली स्वये तुला जोजवाया
निज निज माझ्या बाळा
गाते मी तुला अंगाई ।।३।।

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

२५ टिप्पण्या:

  1. अतिशय भावस्पर्शी अंगाई गीत सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. वाहह सर खुप सुंदर अंगाईगीत , ह्रदयस्पर्शी...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  3. वा! ह्रदयस्पर्शी अंगाई गीत सरजी
    झू झू झू झू झू जू जू👌👌👌👌
    व्ही एम बोरदे

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय सुंदर अंगाई गीत 👌👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...