Kaayguru.Marathi

बुधवार, ऑक्टोबर ०६, २०२१

हास्य (शेलकाव्य)

रे  मित्रा  राहू  नको  तू  उदास नेहमी
नेहमी   राहा   संसारी  तू  हसतमुख
मंत्र  घे तू ध्यानी वजा करावे रे दुःख
दुःख  ते  दे सोडून त्यातच आहे सुख

उक्ती झाले गेले अन्  गंगेला मिळाले
मिळाले  ते  आपुले  रे गेले ते दुजांचे
ओंजळीत  मावते ते हो आपुले सुख
सुख  करीता वजा शेष राही स्वतःचे

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


१७ टिप्पण्या:

  1. अप्रतिम खूप सुंदर लिखाण 👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम शब्दगुंफन केली सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. खुपचं सुंदर मैत्रीची रचना 👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...