नेहमी राहा संसारी तू हसतमुख
मंत्र घे तू ध्यानी वजा करावे रे दुःख
दुःख ते दे सोडून त्यातच आहे सुख
उक्ती झाले गेले अन् गंगेला मिळाले
मिळाले ते आपुले रे गेले ते दुजांचे
ओंजळीत मावते ते हो आपुले सुख
सुख करीता वजा शेष राही स्वतःचे
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "