Kaayguru.Marathi

रविवार, ऑक्टोबर ३१, २०२१

प्रियदर्शिनी इंदिराजी

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान 
स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची आज पुण्यतिथी:
 शब्दसुमनांनी श्रद्धांजली 🌹🙏
✍️ इंदिराजी गांधी

कमला   जवाहरांची  इंदू
अटलजींच्या  दुर्गेचा मान
मोरारजींची   गुंगी गुडिया 
गौरवग्रंथी स्तुतीसुमनांचे पान 
करितो कोटी कोटी प्रणाम. १

बालपणी निर्मिली वानरसेना 
मुक्त  कराया  भारत   देशा 
केली जुलमी इंग्रजाची दैना
भोगीयलास तूम्ही कारावासा
करितो कोटी कोटी प्रणाम. २

बलाढ्य भारत सिद्ध कराया
तुझसी आवडे  विज्ञानक्रांती 
जगी  निःशस्त्रीकरण प्रणेता 
ध्यास  मनी   तव  विश्वशांती 
करितो  कोटी  कोटी  प्रणाम. ३

कणखर   नेता  विश्ववंदिता 
आद्य  हो महिला पंतप्रधान 
आत्मबळे एक्कात्तरचे समरी 
पाकचे  गळविले  देह -भान 
करितो  कोटी कोटी प्रणाम. ४

कथनी  अन् करणी यात 
कधी ना  केला तूम्ही भेद 
कर्तृत्व तुमचे महान एवढे
कोणी   ना  करीला   छेद
करितो कोटी कोटी प्रणाम. ५

श्वासात जनविकास ध्यास 
तुमचे जाणे एक विरमरण
भारतरत्न !  इंदिराजी.. .
हे तर... मातृभूमिस समर्पण 
तुम्हा कोटी कोटी वंदन ! ६

तुम्ही तर मुत्सद्दी आदि अंती 
जगी जन्म नसे कोणी दूजा
तुमच्या दृढसंकल्पा पुढती
उंच हिमगिरी वाटे हो खूजा
करितो कोटी कोटी प्रणाम! ७

© शब्दसौदर्य :-
प्रा.श्री.पुरूषोत्तम पटेल

८ टिप्पण्या:

  1. वाहह..खुप सुंदर गौरविले आहे आपण ईंदीराजींना...👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा
  2. इंदिराजींचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व काव्यातून अप्रतिम शब्दात रेखाटले सरजी!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. वा, सर सुंदर रचना केली इंदिराजींवर👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...