Kaayguru.Marathi

सोमवार, नोव्हेंबर ०१, २०२१

दिपावली

ही दिपावली आपणास सुखाची, समाधानाची,
समृद्धीची,आनंदाची, भरभराटीची,व समस्त
इच्छापूर्तीचा आनंद देणारी ठरो!ही शुभेच्छा!
🪔🪔🪔🪔🪔🎇🎆🪔🪔🪔🪔🪔

     दिपावली (कविता)

महालक्ष्मी देवी मी नमितो
आद्य वंदन चरणी तुजला 
लावितो दिपावली ज्योती
आई !आशिष दे तू मजला ।।१।।

पसरु   दे अखिल संसारी 
लखलख     चंदेरी आनंद
विश्वाचे   दुःख दूर कराया
मनी लागू दे छंद मजला ।।२।।
महालक्ष्मी देवी मी नमितो
...आई, आशिष दे मजला

दे   सद्बुद्धी   जळो  क्लेश
मनामनात  जुळू  दे नाते !
दुष्प्रवृत्ती, दृष्टभाव  हरोनी
नीति,सूमती किर्ती सकला।।३।।
महालक्ष्मी देवी मी नमितो
...आई, आशिष दे मजला

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


३१ टिप्पण्या:

  1. दिपावलीच्या शब्दसुमनांनी सुंदर शुभेच्छा दिल्या सरजी!✍️👌👌👌 महालक्ष्मीची आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहो! ही प्रार्थना 🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुरेख रचना केली सर,✍️✍️✍️
    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🌺🌺🌻🌼🌼🌼

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर रचना 👌👌 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सरजी

    उत्तर द्याहटवा
  4. सुंदर काव्यरचना...!
    आपणास व आपल्या परिवारास दीपावली आनंदमय व आरोग्यमय जावो!

    उत्तर द्याहटवा
  5. सुंदर रचना सर.... दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा... शुभ दिपावली🎉💥🍫🍫🍫🙏👍👌✍️💐

    उत्तर द्याहटवा
  6. सुंदर काव्य ... अप्रतिम .. शुभ दिपावली सरजी ..
    सौ शितल एस पाटील

    उत्तर द्याहटवा
  7. अप्रतिम सुंदर शब्दरचना, सर
    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌟🌟💥💥⭐⭐
    विजय बोरदे

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...