[ आपल्या मायभूमीच्या रक्षणार्थ आई-बाबा,पत्नी व घरदार सोडून सीमेवर अहोरात्र पहारा देत उभ्या असलेल्या सैनिकाची आई,पत्नी यांची आणि विर सैनिकाची हृदयस्पर्शी भावना....!]
* आई -
बाळा...करु नको माझी चिंता
आणू नको तू डोळ्यांत पाणी
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपी गरियसी
शिकवण रे दिधली ऋषीमुनी
बाळा जन्मदात्री ही मी रे तुझी
परी तुज पोशिते ही माय भूमी
सेवा कर तू प्राणाहून प्रियही
आशिष ठेविते तुझा शिरी मी
* अर्धांगिनी -
हे औक्षण करीते तुम्हा मी !
दिव्य ज्योती पेटवुनी नयनी
वाट पाहीन द्यावे वचन मज
भेटावे हो तुम्ही सुखे परतोनी
* वीर सैनिक-
लाज राखाया मातृतभूमीची
प्रिये, लढता लढता मरेन मी
नऊ महिन्यांनी पुन्हा भेटाया
तुझ्याच उदरी जन्मेन मी !
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "