Kaayguru.Marathi

रविवार, ऑक्टोबर १०, २०२१

व्वाव! अप्रतिम!

[ मानवी वृत्ती... 
प्रत्येकाला वाटते...मला सर्वांनी आपले म्हणावे,मला मान द्यावा,माझ्या लेखनाचे,माझ्या गायनाचे,माझ्या कौशल्याचे सर्वांनी गुणगान करावे.वाहवा करावी.असे वाटते.पण, ज्याच्याकडून अपेक्षा करतो ,त्यालाही आपल्याकडून " अशीच सुंदर अपेक्षा " असते हे आपण हेतुत: विसरतो .खरंय ना? काय वाटतं तुम्हाला ? लिहा! बोला! नक्कीच मनमोकळे व्हा ! प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत! ] 
@ प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मित्रहो…
मी कोणी दिले काही तर…
सर्वच काही घेतो चाखून

पण…
जेव्हा देतो मी इतरांना काही
तेव्हा खिशात ठेवतो राखून !

करणार तरी काय ?
शेवटी मानवी स्वभावच ना
यालाच म्हणतात मतलब!

अन् मित्रहो !
दुस-याला द्यायचा फक्त सल्ला
कर भला तो होगा मला !

आपण स्वतः मात्र
चकचक चांदणी...वाटोळं दार !
नको जास्त बोलू न् यार…
….दुखतंय की फार !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


२७ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर रचना केली सर ��������

    उत्तर द्याहटवा
  2. अगदी बरोबर...प्रत्येकजण कौतुकाचा भुकेला असतो... अगदी बरोबर लिहीलत आपण...🥳👍💐

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी सत्य वचन सरजी कौतुक हे प्रेरणा असते.आगम निर्गम....

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...