Kaayguru.Marathi

चिंतन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिंतन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, नोव्हेंबर २०, २०२१

ते सात कृतघ्न !

माझे   पाय   मागे ओढण्याची
बरीच   खलबतं   झाली  होती
संपल्या कितीतरी दिवस रात्री
पण त्यांना यश येत नव्हतं हाती !

आजही   आठवतात  मला  ती
दुराचारी  हो  फक्त सात  डोकी
त्यांना पाहून  वाटते आहे जगी
धृतराष्ट्र  दुर्योधन  ह्या  भूलोकी

ते नव्हते घरचे  होते मला परके
गड्या मी मानले त्यांना  आपले
कृतघ्न त्या शिरी चढवता मुकूट 
मुखवट्यातील  रुप मज कळले

बापच नव्हता त्यांना माहित हो
मीच दिधले की ओळखीचे नाव
दाखला  तयार होताच सगळेच
विसरुन गेले  आपुलकीचा गाव

कफल्लक  होते  तरी मी त्यांना 
स्वबुद्धी  केले प्रधान अन् राजा
अधम असूर  ते खरे! नव्हते सूर
केसाने कापून गळा दिली सजा

म्हणे पुरुषोत्तम ! घ्या   हे ध्यानी
मानव असेल   तर तो मेळवावा
निर्बुद्ध , कपटी  शकुनी वृत्तीला
सुर आपुला कधी ना आळवावा

ऐका माझा मंत्र उघडे ठेवा कान
अधमांचा गळा घालू नका माळा
उपकाराची  ते ठेवत  नाही जाण
कृतघ्न  हो   ते  नका  लावू लळा

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "




शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

बापरे🤭 रावण बोलतोय !🤔

      ✍️जय श्रीराम!🌹🙏
    🤭 बापरे,रावण बोलतोय!🤭

आज विजयादशमी...रावण दहनाचा कार्यक्रम करण्यात आला.मी तिथे उत्सुकता म्हणून गेलो होतो.रावण (प्रतिकात्मक पुतळा) जळतांना चक्क बोलू लागला…!
लोकहो,मी सितेचे एकदाच
अपहरण केले हो !
पण...तुम्ही मला दरवर्षीच
जाळतात हो ! का अन्याय ?

मी सीतादेवीच्या मनाविरुद्ध 
कधी अघोरी वागलोच नाही
अशोक वनात तिच्या सावलीला
क्षणभरसुद्धा थांबलो नाही

सितादेवीच्या अंगालाच काय
नाही घातला वस्रालाही हात 
खरे तर तुम्हीच वागता अघोरी
उत्तर द्या! हिंमत आहे कुणात

तुमच्या राज्यात पावलोपावली
रोज होतात अन्याय अत्याचार
श्रीराम होऊन रामराज्य आणा
करा सारासार तुम्ही विचार !

पोरी- बाळींच्या ईभ्रतीचे तर
तुम्ही लचकेच तोडतात
जाळण्याचा लायकीचे तुम्ही
पण...मलाच का जाळतात?

ऐका,प्रश्न आहे तुम्हाला माझा 
तुमच्या हृदयात आहे न् राम ?
असाल लक्ष्मणाइतके पावन
तरच करा मला जाळायचे काम

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " 






गुरुवार, ऑक्टोबर १४, २०२१

कळी (हायकू )

आठवणीची
कळी हो उमलली
फूल ती झाली
भावार्थ :- कळीची फूल झाल्याचे पाहून अतिव आनंद होतो.तशा सुंदर आठवणी मनाला प्रसन्नता देतात.व त्या आठवणीत आपण हरवून जातो.
पसरे गंध
दशदिशांना मंद
वारा ही धुंद
भावार्थ :- फुलांचा गंध दशदिशांना मंद मंद पसरतो.वाराही धुंदीत न्हाहतो.तसेच आठवणीं ताज्या झाल्या की मनाला धुंद करुन तजेला देतात.
झाला सूर्यास्त
आली कातरवेळ
स्मृतींचा खेळ
भावार्थ:- सूर्यास्त झाला की, कातरवेळ होते.ही कातरवेळ मोठी जीवघेणी.नको त्या स्मृती जीवंत करते.प्रेमात अडचणी आणणा-या व्यक्ती अनेकदा आपलेच प्रियजन असतात.पण,प्रेमात ब-याचदा तेच दुरावतात.ही स्मृती मन विषण्ण करुन जाते.

 © प्रा.पुरुषोत्तम पटेल   " पुष्प "

रविवार, ऑक्टोबर १०, २०२१

व्वाव! अप्रतिम!

[ मानवी वृत्ती... 
प्रत्येकाला वाटते...मला सर्वांनी आपले म्हणावे,मला मान द्यावा,माझ्या लेखनाचे,माझ्या गायनाचे,माझ्या कौशल्याचे सर्वांनी गुणगान करावे.वाहवा करावी.असे वाटते.पण, ज्याच्याकडून अपेक्षा करतो ,त्यालाही आपल्याकडून " अशीच सुंदर अपेक्षा " असते हे आपण हेतुत: विसरतो .खरंय ना? काय वाटतं तुम्हाला ? लिहा! बोला! नक्कीच मनमोकळे व्हा ! प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत! ] 
@ प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

मित्रहो…
मी कोणी दिले काही तर…
सर्वच काही घेतो चाखून

पण…
जेव्हा देतो मी इतरांना काही
तेव्हा खिशात ठेवतो राखून !

करणार तरी काय ?
शेवटी मानवी स्वभावच ना
यालाच म्हणतात मतलब!

अन् मित्रहो !
दुस-याला द्यायचा फक्त सल्ला
कर भला तो होगा मला !

आपण स्वतः मात्र
चकचक चांदणी...वाटोळं दार !
नको जास्त बोलू न् यार…
….दुखतंय की फार !

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...