Kaayguru.Marathi

रविवार, ऑक्टोबर ३१, २०२१

त्रिवेणी लेखन प्रकार : नियम

काव्यलेखन प्रकार : त्रिवेणी 
नियम:-
१) त्रिवेणी ही रचना लिहायला अगदी साधीसुधी अशीच! त्रिवेणी म्हणजे तीन.तीन ओळीत लिहावयाची ही रचना,म्हणून हि " त्रिवेणी रचना " म्हणून ओळखली जाते.
२) त्रिवेणी ही रचना करतांना प्रत्येक ओळीत अक्षरांचे बंधन नाही.मात्र पहिल्या ओळीत जितकी शब्दसंख्या असेल तितकीच शब्दसंख्या तिस-या ओळीतही असावी.म्हणजेच पहिल्या आणि तिस-या ओळीत शब्दसंख्या सारखीच असावी.
३) पहिल्या दोन ओळीत एक विचार मांडलेला दिसतो.तर,तिसरी ओळ कधी पहिल्या दोन ओळींच्या अर्थामध्ये भर घालते.तर कधी ही तिसरी ओळ वेगळाच अर्थ- किंवा दृष्टिकोन देऊन जाते.
४) दुसरी ओळ लयबद्ध आणि अर्थपूर्ण होईल.इतकेच शब्द असावेत.म्हणजेच,या ओळीत पहिल्या आणि तिस-या ओळीत असतात इतके शब्द असणे बंधनकारक नाही.
५) पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत शेवटच्या शब्दांत " यमक " साधला जावा.ह्यामुळे त्रिवेणी वाचतांना लयबद्धता येऊन नादमयता येते.

चला तर...✒️ लिहू या त्रिवेणी काव्य !

माझी प्रिया [ त्रिवेणी ]

तूच माझा श्वास तुझ्याविना गोड लागेना घास = 
[७ शब्द संख्या]
तुझ्याविना क्षणाक्षणाला होतात भास! 
प्रिये आयुष्यभर तुला सुखी पाहीन देवाला विनवतो ! = [७ शब्द संख्या.]

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

१९ टिप्पण्या:

  1. खूप सुंदर रचना आणि माहिती दिली या प्रकाराबद्दल 👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच छान माहिती... 👌👌👌
    अशीच अजून काव्य लिहिण्या बाबत माहिती द्यावी 🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  3. नवीन कवींसाठी काव्य प्रकाराची छान माहिती.

    उत्तर द्याहटवा
  4. वाहह... खुप सुंदर माहीती दिलीत आपण... खुप खुप धन्यवाद...🙏🧚🏻‍♀️😊💐🍫

    उत्तर द्याहटवा
  5. खूपचं उपयोगी माहिती दिले आहे सर तुम्ही
    धन्यवाद😊🙏

    उत्तर द्याहटवा
  6. नवोदित कवींना खूप मौलिक मार्गदर्शन करणारी माहिती दिली सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...