Kaayguru.Marathi

सोमवार, ऑक्टोबर ०४, २०२१

स्वच्छ भारत

      घडवू देश नवा 

अस्वच्छ,अमंगळ फेकू सारे
भारत स्वच्छ घडवू या
इकडे तिकडे दिसता कचरा
उचलून त्यासी फेकू या || धृ. ||
        
        ओला कचरा सुका कचरा
        वेगवेगळा गोळा करु या
        संस्कार करुनी त्यावरती
        सुफलाम भारत घडवू या ||१||

नका करु शौच उघड्यावर 
शौचालयी शौचास जाऊया
निर्मळ करु ग्राम आपण
हागणदारीमुक्त जगू या || २||
       
       घरास बनवू पावन मंदिर 
       गाव नंदनवन बनवू या
       स्वच्छ ठेवा काया आपुली
       संकल्प आपण करुया ||३||

© प्रा. पुरुषोत्तम पटेल " पुष्प "


२२ टिप्पण्या:

  1. अप्रतिमच सर..खूप छान संदेश ..अप्रतिमच रचना 👌👌👌👌💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर संदेश....स्वच्छता अभियानासाठी या कवितेचा नक्कीच उपयोग होईल 👌👌👌👌✍️✍️✍️✍️

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर संदेश दिला रचनेतून 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम रचना सर... आणि खूप सुंदर संदेश दिला आपण...👌👌🙏

    उत्तर द्याहटवा
  5. सुंदर रचनाविश्कार सरजी... स्वच्छ तन-मन,तेची खरे धन! अप्रतिम शब्दगुंफन!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...