💎दुर्गादेवीचे स्वरूप : स्कंदमाता 💎
आपण देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, व अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. आतापर्यंत आपण देवीच्या चार रुपांची माहिती जाणून घेतली.
नवरात्रीचे दुसरे फळ वंशवृद्धी असेही आहे.
नवरात्रीचा पाचवा दिवस : देवी स्कंदमाता
" सिंहासनगता नित्य पद्माश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी।। "
दुर्गेचे पाचवे रूप '' स्कंदमाता " या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन " विशुद्ध '' चक्रात स्थिर झालेले असते. भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते.
भगवान स्कंद '' कुमार कार्तिकेय '' नावानेही ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे देवीच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओंळखले जाते.
💎 दुर्गादेवीचे स्कंदमाता स्वरुप
स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे.डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे नवदुर्गेचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे.
💎 स्कंद शब्दाचा अर्थ:
स्कंद म्हणजे तज्ञ, निष्णात. सामान्यपणे जे तज,प्रविण असतात ते उद्धट असतात. पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे. नवरात्रीतील पाचव्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पदमासना स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते. यादरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे. सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे.
💎 स्कंदमाता उपासनेचे फळ
स्कंदमातेच्या उपासनेने भक्ताची इच्छा पूर्ण होते. मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो. त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो. स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. स्कंदमाता देवीचे व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही.
हा पाचवा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते.
💎 पाचवी माळ
पाचवी माळ ही बेल किंवा कुंकवाची वाहतात..
💎 स्कंदमाता देवीचा मंत्र
" सिंहासना गता नित्यं पद्माश्रि तकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।।
या देवी सर्वभूतेषु मां स्कंदमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।। "
💎 स्कंदमाता पूजन
देवीचे पूजन करताना सौभाग्यलंकार अर्पण करावे. लाल रंगाचे फूल, अक्षता वाहावे.
💎 स्कंदमातेला नैवेद्य :
देवीला केळ्याचा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा. देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा आवर्जुन वापर करावा.
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अतिशय उपयुक्त माहिती दिली सरजी अप्रतिम लेखन ✍️������
उत्तर द्याहटवावाहह..खुप सुंदर व उपयुक्त आध्यात्मीक माहिती...आध्यात्मीक ज्ञान वाढवणारी.. धन्यवाद सर...🙏😊💐🍫
उत्तर द्याहटवाअप्रतिम देवीचे स्तवन
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर माहिती👍
उत्तर द्याहटवाउपयुक्त माहिती..खूपच सुंदर.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम माहिती👌👌👍
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती दिलीत सर🙏🙏👌👌👌👌
उत्तर द्याहटवा