Kaayguru.Marathi

शुक्रवार, ऑगस्ट १५, २०२५

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३
विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र
दिनांक -१५/०८/२०२५
सूचक - सौ.पुष्पा पटेल "पुष्प"

आला उत्सव स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सवी दशकाचा
घरोघरी फडकवू तिरंगा
संदेश पसरवू एकतेचा

देशप्रेमाची ज्योत पेटवू 
गाऊन गाथा बलिदानाची
वंदे मातरम् देऊन नारा
जागवू हो स्मृती शहीदांची

केशरी पांढरा आणि हिरवा
जगावेगळा तिरंगा आमुचा
श्वेतभागी अशोकचक्र साजे
जाणीव करी ते कालचक्राचा

केशरी रंग शिकवी त्याग 
श्वेत सत्य शांती पावित्र्याचा
समृद्ध राष्ट्रनिष्ठा शिकवी हिरवा
प्राणाहुन प्रिय तिरंगा भारतभूचा

शपथ घेऊ भूमाता रक्षणाची
करु या अभिषेक हा रक्ताचा
फडकत ठेवू उंच आभाळी
प्राणपणे तिरंगा स्वातंत्र्याचा

विसर न व्हावे कधी न आम्हा
लाल बाल पाल यांचे कार्य 
खल कितीही असो बलवान
हरवू त्यास टिकवूनी धैर्य !

शब्दाशब्दांत करु या गर्जना
भगतसिंगांचा इन्कलाब जिंदाबाद 
आठवून विदाची स्वातंत्र्य निष्ठा
देऊ देशअभिमानाची साद !

चंद्र सूर्य असेतो नभी राखू
आपण गौरव भारतमातेचा
वाकड्या दृष्टीने पाही जो शत्रू
घोट घेऊ त्या असूर रक्ताचा !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प”

३ टिप्पण्या:

  1. नमस्कार Sir,
    खूप छान देशभक्तीपर काव्य रचना केलीय.
    एका काव्यात स्वातंत्र्याचा, त्यागाचा आणि
    बलिदानाचा गौरव करून सृती जागृत केल्यात.
    खूपच छान रचना केलीय.
    आणि आता ब्लॉग सुध्दा खूप सुंदर झालाय.
    धन्यवाद..!
    आबा

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर रचना 🇮🇳🇮🇳

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर शब्दांत तिरंगा राष्ट्रध्वजाचे वर्णन आणि स्वातंत्र्यासाठी शहिद झालेल्या क्रांतिकारकारकांच्या त्याग व बलिदानाचे वर्णन.,
    भारतमाता की जय!🌹🙏

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...