पहाटे स्वप्न असे पडले
बाई,सांगताना वाटते लाज
पण सारे विपरितच घडले😛
नव-याला झोपेतनं उठताच
मळमळ ओकारी झाली
जेवणाखाण्याची म्हणे
इच्छाच नाही राहिली🤭
नव-याचा अशा वागण्याने
मी दवाखान्यात नेले
तपासणीअंती डॉक्टर म्हणे
अहो बाई,यांना दिवस गेले !😋
तुम्ही घ्या यांची काळजी
झाला यांना सव्वा महिना
दर महिन्याला आठवणीने
सोनोग्राफीला नक्की आणा👍
मनापासून देवबाप्पाचे मानले
मी खूप खूप आभार
नव-याला सहज झेपू दे
बाप्पा नऊ महिन्याचा भार ! 🙏
घरी येताच ते मला म्हणाले
हौसेने पुरव माझे डोहाळे
खावेसे वाटतात गं मला
कच्चे चिंच कैरी अन् आवळे 🍏
त्यांना रोज उठता बसता
सूचना झाल्या माझ्या सुरु
पटकन उठण्या बसण्याचे
काम आता नको हो करु!🤲
सात महिन्यांचा काळ
सहजच निघून गेला
डिलिव्हरीचा पिरीएड
फक्त दोन महिने राहिला✌️
नववा महिना लागताच
त्यांना सुरु झाल्या कळा
वेदना असह्य होऊन
सुरु झाला कळवळा🧔
डॉक्टर म्हणे डिलिव्हरीला
थोडाही नको उशीर
लवकरात लवकर ह्यांचे
करावे लागेल सिझर🤭
नव-याच्या चिंतेने माझे
व्याकूळ झाले मन
फॉर्म भरुन देऊन
सही केली मी पटकन📝
डिलिव्हरीसाठी नव-याला
ऑपरेशन रुमला नेलं 🛌
अर्ध्या तासाच्या परिश्रमाने
गोंडस बाळ जन्मा आलं🚼
अलार्म वाजताच सहाचा
स्वप्न माझं गाभडलं
नव-याचा पहिल्या बाळाचं
बारसंही राहून गेलं…!🧭
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद
मोबाईल नं.9421530412