Kaayguru.Marathi

रविवार, जानेवारी २३, २०२२

आई

  आई

आई, माझ्या जन्मासाठी 
नऊ मास नऊ दिस तू
सोसल्या अनंत वेदना 
आई, तुझ्यामुळेच 
मी पाहतोय ही दुनिया ।।१।।

आई, जन्मापासून तूच
माझ्या आद्य वंद्य गुरु 
तुझ्याच संस्कार वाटेवर 
माझी वाटचाल सुरु.   ।।२।।

आई, तुझा एकेक शब्द 
मला गीता रामायण 
कृतघ्न अन् अधम ठरे 
तुझे होता विस्मरण    ।।३।।

◽प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "
 म्हसावद

१० टिप्पण्या:

  1. खुपच सुंदर रचना 👌👌👌✍️✍️🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा
  2. आई ही आईच असते म्हणून तर म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...