Kaayguru.Marathi

सोमवार, जानेवारी १७, २०२२

कविता लेखन करतांना...

कविता म्हणजे काय ?
असे म्हणतात की, " गोष्टीला द्रवरूप होऊन भिडण्याची क्षमता म्हणजे कविता होय. " 
म्हणून म. सु. पाटील म्हणतात, 
‘ तिचा वेध घेण्यासाठी कवी स्वत:मध्ये जितका खोलवर बुडी घेतो, तितका तो कमी वैयक्तिक बनत जातो. तो मानवाच्या मूलभूत स्वभावापर्यंत पोचतो. अशा वेळी सर्वांना समान अशा मानवभावांची नाना रूपे आकलण्यात व ती अभिव्यक्त करण्यात तो गढून गेलेला असतो. तेथे कवीचे भाव वैयक्तिक राहत नाहीत. आविष्कार प्रक्रियेतच ते स्व-पर-तटस्थ
संबंधांच्या पलीकडे जातात.म्हणून ते कोणाचेही होतात. त्यांना विश्वात्मता प्राप्त होते. ’ त्यामुळे जगण्याच्या सर्वसामान्य तऱ्हांपेक्षा ती जाणिवेला अधिक तीव्र भासते. या तीव्रतेमागे चिरंतन आणि सार्वत्रिक होण्याची इच्छा प्रबळपणे कार्यरत असते. सर्वसामान्य चेहऱ्यांमधीलच एक स्वतंत्र आवाज म्हणजे " कविता " होय
२) रचना आणि धारणा यांमधील सगळ्यात कमी अंतर म्हणजे कविता होय. त्यामुळे ‘स्व’ला पुन:पुन्हा मोडण्यातून आणि रचण्यातून ती उत्पन्न पावते.
' स्वप्न रचणे ’ हा कवितेचा स्थायी भाव असतो. त्यामुळे ‘ कविता ’ ही रचना तीनही काळांच्या पार्श्वभूमीवर खरचटून उभी राहणारी रचना ठरते. ती विसंगतीने व्याकूळ होऊन घडणारी रचना आहे. त्यामुळे कवितेतील कुठलेही विधान जितके अधिक स्वप्नपूर्ण, तितके तीनही काळांच्या पार्श्वभूमीवर ते अधिकाधिक प्रभावी ठरते. कारण हे स्वप्नपूर्ण विधान काळाशी, वास्तवाशी फटकून उभे राहत नाही, तर काळाला सामावून त्याच्या पुनर्रचनेतून हे विधान उभे राहते.

@ प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

१० टिप्पण्या:

  1. अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली सरजी ✍️👌👌 असंच मार्गदर्शन करत रहा म्हणजे आमच्या सारख्या नवीन काव्यलेखकांना ती माहिती मार्गदर्शक ठरेल 🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. मार्गदर्शनपर माहिती लेख आहे ...✍️✍️✍️ खुप छान 👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. खूप महत्त्व पूर्ण माहिती सर.....👍👌🍫✍️

    उत्तर द्याहटवा
  4. अगदी बरोबर...मनाच भाव शब्दांत माडण्याच साधन म्हणजे कवीता...!!
    खुप सुंदर माहीतीपूर्ण पोस्ट... धन्यवाद सर...🙏😊

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...