आज ' राष्ट्रीय कन्या दिन ' समस्त लेकींना समर्पित
माझे हे काव्य !
लेक माझी…
लाडाची गुणांची खाण
तिच्या जन्मानं गायलं
देवानं माझा जीवनाचं
अविट सप्तसुरांचं गाण ।।१।।
माझ्या संसार अंगणी
उगवलं लख्ख चांदणं छान
लेक माझी…
भासे नवदुर्गा अंबा,भवानी
काली,अन्नपूर्णा,जगदिश्वरी,
नवविचार नऊ रुपांनी
माझा मना येई उधाण।।२।।
माझ्या संसार अंगणी
उगवलं लख्ख चांदणं छान
लेक माझी…
प्रात:काळची मधुर भूपाळी
माझा जगण्याचा श्वास
जन्म माझा धन्य कराया
देवानं दिला पित्याच्या मान।।३।।
माझ्या संसार अंगणी
उगवलं लख्ख चांदणं छान
लेक माझी…
माझा जीवनग्रंथाचं पान
लेकीच्या रुपात धाडलं
भगवंताने माझा दारी
आनंदाचं शुभवर्तमान।।४।।
माझ्या संसार अंगणी
उगवलं लख्ख चांदणं छान
©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " म्हसावद
वाह, अप्रतिम रचना केली सर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाक्ऋतज्ञ 👌🙏🙏
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌
उत्तर द्याहटवाकंन्या दिनाचे हे मनोगत..!
खूप खूप शुभेच्छा 🌷
खुपच सुंदर रचना 👌👌👌🙏🏼
उत्तर द्याहटवाछान👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम, अलौकिक, अतुलनीय असे शब्दसौदर्य!👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच छान👌
उत्तर द्याहटवाKhup chhan
उत्तर द्याहटवाराष्ट्रीय कन्यादिनाच्या खुप खुप शुभेच्छा .. अप्रतिम वर्णन👌👌✍️
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाव्वा...अप्रतिम रचना👌👌👍👍
उत्तर द्याहटवा