Kaayguru.Marathi

गुरुवार, जानेवारी २७, २०२२

माणूस

 
जीवन तुरुंगाच्या ऊंच भिंती
 येथे कुणी नाही कुणासाठी
 संपतात येथे रक्ताची नाती
 मातीही राखते ईमान
 ...जे पेरले ते अंकुरण्यासाठी
 मात्र...माणूस नेहमीच
 का असतो बेईमान ?
 स्वार्थाची माणसाला तहान
 मतलबासाठी स्वत्व ही गहाण
 आणि..जंगलही जळते 
 वणवा होऊन ..
 समर्पणाने ते ही होते बेभान
 मात्र...माणूस कृतघ्नपणे
 का होतो हैवान ?
 विश्वासाचे होतात घात
 रक्ताने माखतात हात
 श्वासाने फुंकायचा असतो श्वास
 मात्र... येथे का गळ्यात 
 वंचनेचे फास ?
 हे भग्न चित्र रंगविण्यासाठी
 अपुरा पडतो कँनव्हास
 अन्..इथेच संपते...
 जीवनायुष्याची आस ! 

         ■ प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "
             म्हसावद.ता.शहादा

११ टिप्पण्या:

  1. कटु वास्तवदर्शी रचना... अप्रतीम लेखनशैली...👏👏👏💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. मानवी जीवनातील कटूसत्य अगदी उत्कृष्ट लेखनशैली वापरून केले आपण सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  3. व्वा! खुप सुरेख शब्दांची मांडणी केलीय.

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

रंगोत्सव सांगे लोका !

रंगोत्सवावाच्या गर्दित  सगळे सारखे दिसतात आपला परका कोण ? ओळखतांना फसतात रंगोत्सव म्हणे लोकांना माझ्याशी करा दोस्ती विसरुन जाल त...