अनंत कोटी - कोटी अनंत हात
अखेरच्या क्षणी रे सरणावरती
शुष्क लाकडांचीच मिळते साथ !
सुखात आमचाच म्हणणारे ही
संकटे येताच हो पळ काढतात
अखेरच्या त्या क्षणी माणसाला
जमीन पुरते हो साडेतीन हात
जगी कोणीच नसतो रे कुणाचा
सगळेच म्हणती हे अंतीम सत्य
तरी हा माझा, ती माझी,ते माझे
म्हणतच जगती इथे हे नव्हे असत्य…!
म्हणूनच म्हणे हा " पुरुषोत्तम "
नको रे करु मोह नको रे माया
जन्मभर का झिजवशी मानवा
सन्मार्ग विसरुन स्वार्थाने काया !
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
Nice👍
उत्तर द्याहटवाअगदी योग्य
उत्तर द्याहटवाजीवनाचे मर्म अगदी योग्य पध्दतीने उलगडत अप्रतिम रचनाविष्कार केला सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर 👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम 👌👌👌
उत्तर द्याहटवाव्वा....अप्रतिम👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुरेख शब्दांकन... प्रेरणादायक रचना...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवा