वारसदार दोन हजार बावीस हजर
प्रार्थना माझी तुजला हे नुतन वर्षा
दुःख क्लेश नको ! येऊ दे हर्षलहर
पिडले जन केला कोरोनाने कहर
गणती नसे किती गळाले मोती ?
बहरु दे स्नेह-सौख्य प्रितीचे मळे
जोडून दे नववर्षा तुटली ती नाती
अरेऽऽ दुःख गिळूनी तुझ्या स्वागता
सज्ज पहा सकल झाली दुनिया !
गुंडाळून ठेव आता नवीन व्याधी
तू तरी दाखव सुख-समृद्धी रया
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
Nice👌
उत्तर द्याहटवावाह वाह अप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना सरजी .👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर रचना...👌👍💐
उत्तर द्याहटवा