हव्यास संपतच नाही
गड्या,असं करुन करुन
पोट कधी भरत नाही
गुंठा गुंठा जमिनीसाठी
तू आयष्यभर राबलास
शेवटच्या क्षणी सगळं
ते इथेच सोडून गेलास
शेत कसता कसता तू
जन्माची खाल्ली खस्ता
बांध कोरुन कोरुन तू
चोरला रे वहिवाट रस्ता
हिस्से वाटणी करतांना
तोलून मापून घेतलं
अन् एका एका इंचासाठी
भावांचंच डोके फोडलं
तू गेल्यावर पोराबाळांनी
गुंठा विकून श्राद्ध केलं
घामाचा थेंब न गाळता
मौज मस्तीतचं खाल्लं
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
वास्तव मांडले सरजी ✍️✍️🌟🌟🌟
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाकटु वास्तवदर्शी , अप्रतीम रचना... खुप सुंदर शब्दांकन...👌👍💐
उत्तर द्याहटवा✍️✍️✍️👌👌👌👌👌खूप सुंदर, वास्तववादी रचना.
उत्तर द्याहटवावास्तववादी रचना...👍👌✍️🍫
उत्तर द्याहटवा