Kaayguru.Marathi

शनिवार, जानेवारी २२, २०२२

बुद्धदेवाचे दर्शन !


मन झाले हो आज माझे शुद्ध
दर्शनास आले आज मज बुद्ध

दिला उपदेश मज 
पाया चिरडू नये मुंगी
उतरली हो आज माझी
अभिमानाची गुंगी
सुविचारांचा पथावर झालो शुद्ध
दर्शनास आले आज मज बुद्ध

म्हणाले मज समजून घे
न दुखवावे काया वाचा कुणा
अहिंसा परमोधर्म
ध्यानी असू दे रे मना
जन्म एक कर्म नाही रे युद्ध
दर्शनास आले आज मज बुद्ध

सर्वाभूती मीच वसे
जे जे रंजले गांजले
म्हणू नये त्यासी हिन दिन
नाम अनंत रुप वेगळाले
दावी विश्वरुप प्रकटले अनिरुद्ध
दर्शनास आले आज मज बुद्ध

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

११ टिप्पण्या:

  1. अप्रतिम शब्दगुंफन केली सरजी ✍️✍️🌟🌟🌟🌟🌟

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा...!अतिशय सुंदर शब्दगुंफण केली सर जी👌👌👌👍👍
    🌹🌹शुभ प्रभात🌹🌹

    उत्तर द्याहटवा
  3. वाहह... खुप सुंदर व्यक्त झालात सर...👏👏👏👏
    🙏नमो: बुद्धाय🙏

    उत्तर द्याहटवा
  4. खुपच सुंदर... बुद्ध प्रेरणा.... 🙏🏼🙏🏼

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...