Kaayguru.Marathi

बुधवार, जानेवारी १२, २०२२

शिवसूर्य जननी


स्वराज्यजननी राजमाता जिजाऊसाहेब यांना 
🙏🌹शब्दसुमनांनी विनम्र अभिवादन!🌹🙏
                       शिवसूर्य जननी
दशदिशांना काळोख असता
तू झाली सह्याद्रीच्या उषःकाल
तुझ्याच पोटी शिवसूर्य उदेला
जाळीयेला अन्यायाचा काळ 

तुझ्या रुपे प्रकटली भूवरी
अष्टभूजा जगतजननी भवानी
शब्दाशब्दात प्रसवे तुझ्या
दृष्ट दुर्जन संहारक वाणी

अनंत यातना सोसून वर्मी
आऊ ! तू मानिली ना हार
शून्यातून निर्मिले हिंदस्वराज्य
खजील केलेस शत्रू ते चार !

जिजाऊ तुमचे विचारधन
पेरीले हो मी माझ्या हृदयी 
कोटी कोटी विनम्र अभिवादन
करितो आज पावन समयी !🙏
   
🙏🙏🙏🌹विनम्र अभिवादन!🌹🙏🙏🙏
        ©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "



१२ टिप्पण्या:

  1. अप्रतिम शब्द रचना.. लेखणी तळपत आहे सर...👏👏👏🧁👍👌✍️✍️✍️✍️🍫🍫🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम रचनाविष्कार सरजी ✍️👌👌👌 जिजाऊंना विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर वाक्यरचना व्वा.... विनम्र अभिवादन👌👌👌👌

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...