Kaayguru.Marathi

गुरुवार, जानेवारी २०, २०२२

वसुंधरे तू द्यावेस दान !

वसुंधरे तू द्यावेस दान !
हे वसुंधरे तू द्यावे मज मुक्तहस्ते
पेरीतो मुठीत  घेऊन एक दाणा
टाकून दे  भूवरी मोत्यांच्या सडा
तृप्त  होऊ   दे  सकल जीवांना !

हे वसुंधरे तू द्यावे मज मुक्तहस्ते
ओथंबून  यावे  मेघ  येथे सगळे
व्हावी शांत तृषा द्यावे समाधान 
विरुन जावी दिसणारी मृगजळे

हे वसुंधरे तू  द्यावे मज मुक्तहस्ते
फूलू  फळू   दे  शेतशिवार सारी
कणसात चमकू दे माणिक-मोती
दैन्य   सरु दे ! लक्ष्मी यावी  दारी

हे  वसुंधरे तू द्यावे मज मुक्तहस्ते
हाती न राखता नीती- मती दान
सरु दे  शत्रूबुद्धी द्वेष अन् क्लेश
दिगंतराळी जावो समृद्धीचे गाणं

©® प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

१२ टिप्पण्या:

  1. अप्रतिम शब्दांत वसुंधरेला आळवणी सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर काव्यरचना...वसुंधरेबद्दल असणारा कृतज्ञ भाव खुप सुंदर शब्दांत मांडला आहे...👏👏👏💐💐💐🍫🍫🍫

    उत्तर द्याहटवा
  3. वाह, अतिशय सुंदर रचना केली सर 👌👌✍️✍️

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

भजन म्हणजे काय?

भजन म्हणजे काय? भजन हा संस्कृत शब्द आहे, "भजन" या शब्दाची फोड (विग्रह) 'भज + अन' अशी करता येते. 'भज...