[ शब्दसुमनांची ही श्रद्धांजली 🌹🙏]
अनाथांची आई तू
नाव तुझं सिंधुताई
शब्दात तुझी महती
सांगता यायची नाही
माई जन्मापासून तू
खूप खाल्ल्या खस्ता
जिद्द मनात ठेवून
शोधला सेवेचा रस्ता
माई तू जळत्या चितेवर
भाजून खाल्ली भाकरी
स्वाभिमाने जगली माई
केली नाही कधी चाकरी
माई तुझ्या शब्दा-शब्दांत
माया -ममत्वाची पखरण
तुझ्या दोन्ही हातात
जणू निर्धाराचा घण
आई-बाबाविना पोरक्यांची
माई , झाली तू तर माय
रंजल्या गांजल्या बाळांना
झाली चालण्याचा पाय
माई तू जगविली ममत्वे
जणू दिड सहस्र बालतरु
ममता बालसदन अंगणी
आनंदें खेळतात लेकरु !
माई...देश विदेशात आहे
तुझ्या कार्याचे गुणगान
मिळवले स्वकर्तृत्वाने तू
सातशेहून अधिक सन्मान
माई तुझ्या कार्यापुढे
वाटे गगनही हे खुजे
झाले बहू होतीलही बहू
पण तुझ्यासम न दुजे
माई तुझ्या विचारात मज
दिसे आभाळाची निळाई
तुझे एकमेवाद्वितीय कार्य
अनंत पिढ्यांना नवलाई
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
अप्रतिम अशी शब्दसुमनांजली सरजी सिधुताईंच पूर्ण जीवन कर्तृत्व मांडले आपण ✍️👌👌👌 ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹
उत्तर द्याहटवासुंदर रचना.. माईना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏
उत्तर द्याहटवासर सिंधुताईंची महती आपण अगदी सुंदर रितीने काव्यात मांडली👌👌✍️ भावपूर्ण श्रद्धांजली त्या हजारो अनाथांच्या माईंना🙏🙏💐💐
उत्तर द्याहटवाNice👌💐
उत्तर द्याहटवाभावपुर्ण श्रद्धांजली... छान लिहिलंय
उत्तर द्याहटवाछान लिहिले आहे 🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली.
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना...💐👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर काव्यरचना!
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दात श्रद्धांजली 💐💐
उत्तर द्याहटवाभावपूर्ण श्रद्धांजली खुप सुंदर रचना
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा