Kaayguru.Marathi

शनिवार, जानेवारी ०८, २०२२

बाप समजतो तेव्हा !


बापाची    नजर    होती   करारी
रुबाब  तर  काय सांगू लई भारी
रंजल्या    गांजल्या    माणसाला
आयुष्यभर  दिली त्यांनी  उभारी 

उपाशी राहून भरवला मुखी घास
मला   दिला आनंद सुखाची रास
काट्याकुट्याची    तुडवून    वाट
माझ्या भल्यासाठी सोसला त्रास !

बाप   हयात   होता  तोपर्यंत  तो
कळूनच  आला  नाही मला कधी
बाप   समजून   यावा   म्हणून...
बाप  व्हावे  लागते आपण आधी

© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "

१२ टिप्पण्या:

  1. खरंय अगदी बाप समजायला आधी बापच व्हावं लागतं 👌👌 हृदयस्पर्शी लेखन केले सरजी ✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम रचना ...खुप सुंदर...👌👌✍️✍️✍️

    उत्तर द्याहटवा
  3. खुप सुंदर शब्दांत पितृप्रेम व्यक्त केले आहे..!!👌👍💐🍫

    उत्तर द्याहटवा

Mhasawad.blogspot.com

तिरंगा आमुची शान!

सातपुडा साहित्य मंच आयोजित उपक्रम क्र- ५३ विषय - स्वातंत्र्यदिन: जगण्याचा मूलमंत्र दिनांक -१५/०८/२०२५ सूचक - सौ.पुष्पा पटेल ...