जीवन तुरुंगाच्या ऊंच भिंती
येथे कुणी नाही कुणासाठी
संपतात येथे रक्ताची नाती
मातीही राखते ईमान
...जे पेरले ते अंकुरण्यासाठी
मात्र...माणूस नेहमीच
का असतो बेईमान ?
स्वार्थाची माणसाला तहान
मतलबासाठी स्वत्व ही गहाण
आणि..जंगलही जळते
वणवा होऊन ..
समर्पणाने ते ही होते बेभान
मात्र...माणूस कृतघ्नपणे
का होतो हैवान ?
विश्वासाचे होतात घात
रक्ताने माखतात हात
श्वासाने फुंकायचा असतो श्वास
मात्र... येथे का गळ्यात
वंचनेचे फास ?
हे भग्न चित्र रंगविण्यासाठी
अपुरा पडतो कँनव्हास
अन्..इथेच संपते...
जीवनायुष्याची आस !
■ प्रा.पुरूषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद.ता.शहादा
कटु वास्तवदर्शी रचना... अप्रतीम लेखनशैली...👏👏👏💐💐💐
उत्तर द्याहटवाअप्रतिम👌👌
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवामानवी जीवनातील कटूसत्य अगदी उत्कृष्ट लेखनशैली वापरून केले आपण सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाअगदी वास्तव मांडले
उत्तर द्याहटवावास्तविक लिखाण.... 🙏🏼🙏🏼🙏🏼✍️✍️✍️
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाव्वा! खुप सुरेख शब्दांची मांडणी केलीय.
उत्तर द्याहटवाNice👍
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवासुंदर रचना 👌👌
उत्तर द्याहटवा