आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे,
‘' राजा शिवछत्रपती '’ या ग्रंथाचे लेखक, ‘' जाणता राजा '’ या महानाट्याचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे.२९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवड येथे झाला. परंतु ते इतिहास संशोधन व साहित्य क्षेत्रात विशेष करून बाबासाहेब पुरंदरे याच नावाने सुविख्यात झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी याच वर्षी २९ जुलै २०२१ रोजी वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्याप्रसंगी भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री
मा.नरेंद्रजी मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे , मा.राज ठाकरे, आणि विविध क्षेत्रातील दिग्गज नेते, जनसामान्य नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करुन त्यांना शतकोत्तर आयुष्याचा शुभेच्छा दिल्या होत्या.तेव्हा नुकतीच वयाची ९९ वर्षे पूर्ण करुन १०० व्या वर्षात पदार्पण करताना ते म्हणाले होते की, " महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचा अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा मोठा विषय आहे. या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास, वाचन आणि लेखन करून स्वत: काही करी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. पण, शिवचरित्राविषयी अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे ! तेव्हाच ते म्हटले होते की “आणखीन दोन तीन वर्षे मिळाली तर…! ” असं म्हणत एक इच्छा व्यक्त केलेली होती.ती इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेले.त्यांचे जाणे म्हणजे -
मला वाटते की, " बाबासाहेब पुरंदरे हे शिवकालीन इतिहासाचे जीवंत साधन होते.महाराष्ट्रातील एकेक किल्ला ; जे किल्ले छत्रपती शिवरायांनी पायाखाली घेतले,ज्या किल्ल्यांवर छत्रपतींनी भगवा झेंडा रोवला,आऊसाहेबांच्या व आबासाहेबांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य स्थापन केले, गडकोटावरुन आपल्या आदर्श विचारांचे दशदिशांना वा-याद्वारा अन्याय अत्याचार करणा-या यौवनी सत्तेला ' याद राखा, माझ्या आया-बहिणींवर वाकडी नजर टाकली तर डोळे काढून हातात देईन- गर्दंन छाटली जाईल.' असे खलिते पाठविले.त्या आऊसाहेब जिजाऊ सरकार, छत्रपती शिवाजीराजे यांच्याशी संबंधित एकेक घटना, एकेक संवाद, एकेक खलबत, राजांचा दिलदारपणा,राजांची सहिष्णूता,
राजांची युद्धनीति, राजांचे शिलेदार व मावळ्यांप्रती असणारे प्रेम - जिव्हाळा, शत्रूला देण्यात येणारी वागणूक, शिवरायांचा रयतेविषयी व कुटुंबीयाविषयीचे समान विचार व शिस्त , राज्यकोषाचा सांभाळ, युद्धनिती व युद्धाची साधने, गडकोटांची व गिरिकंदरांची माहिती, इत्यादि त्यांनी स्वतः आयुष्यभर गडकिल्ले व परिसर भ्रमंती करुन मिळविली.जुने दस्तावेज मिळवून माहितीची खातरजमा केली. माहिती संकलित करुन शिवचरित्राचा अनमोल ठेवा घराघरात पोहचविला.ते जणू शिवकालीन इतिहासाच्या चालता बोलता " संवाद कोश " होते असे म्हणता येईल.
त्यांनी अखेरपर्यंत शिवचरित्राची १२००० व्याख्याने दिलीत.
बाबासाहेब पुरंदरे लिखित ग्रंथ साहित्य :-
✒️आग्रा. ✒️कलावंतिणीचा सज्जा.
✒️जाणता राजा. ✒️पन्हाळगड
✒️पुरंदर. ✒️पुरंदरच्या बुरुजावरून
✒️पुरंदर्यांच्या सरकारवाडा ✒️महाराज
✒️पुरंदर्यांची नौबत. ✒️प्रतापगड. ✒️फुलवंती
✒️महाराज. ✒️मुजर्याचे मानकरी
✒️राजगड. ✒️लालमहाल
✒️राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
✒️शिलांगणाचं सोनं. ✒️शेलारखिंड
✒️सावित्री. ✒️ सिंहगड
🌟ध्वनि-फीती
🎤बाबासाहेब पुरंदरे यांचे कथाकथन - भाग १, २, ३ (कॅसेट्स आणि सीडीज)
🎤शिवचरित्र कथन भाग १ ते १५ कॅसेट्सचा आणि सीडीजचा सेट
प्राप्त सन्मान आणि पुरस्कार :-
🌟 डी. लिट. (२०१३)
🌟 महाराष्ट्रभूषण पुरस्कार (१९ ऑगस्ट २०१५ )
🌟 गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (२१-२-२०१६)
🌟 प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१२)
🌟 पद्मविभूषण (२०१९)
अखिल भारतीयांना व शिवप्रेमींना वंदनीय आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले.त्यांच्या निधनाने एक सच्चा शिव-गड-कोट प्रेमी , इतिहास संशोधक , गडकिल्ल्यांच्या साहित्यिक कालौघात विलीन झाला.त्यांच्या इतिहास संशोधन कार्याविषयीविषयी एकच म्हणता येईल -
" झाले बहू । होतील बहू । परि या सम हा ।। "
त्यांच्या कार्य कर्तृत्वाला मानाचा त्रिवार मुजरा !
🙏🌹💐भावपूर्ण श्रद्धांजली!💐🌹🙏
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
खुप छान लेख लिहिला आहे...
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर लेख बाबासाहेबांन बद्दलचा🙏🙏🙏🙏🙏🌼🥀🌹🌹🌹🥀🥀🥀
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख आणि माहिती दिली सर 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप छान माहीतीपूर्ण लेख...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती संकलन सर जी👌👌👌👌
उत्तर द्याहटवा