संस्कार. ... प्रत्येकाच्या जीवनवेलीवर उमलणारे अप्रतिम पुष्प ! पुष्प जसे सुगंधित वासाचे आणि बिनसुगंधित वासाचे असे दोन प्रकारचे असतात, तसे संस्काराचे देखील आपणास दोन प्रकार सांगता येतील.
१) पवित्र-आदर्श संस्कार आणि
२) कुसंस्कार; हा विघाशक विघातक संस्कार होय.
अयोध्यापती श्रीरामचंद्रजी यांचावर जे संस्कार झाले ते पवित्र व आदर्श होत. विनम्रता, सहिष्णुता, प्रजाहितदक्षता,मातृ-पितृभाव,गुरूज्ञाचे पालन,
कुटुंबवत्सलता,परस्त्रीला माता मानणे,पित्रृज्ञेचे पालन, एकपत्नीभाव,सज्जनाचे रक्षण, दृष्टांचे निर्दालन, बंधूभाव त्याग व इतराप्रति समर्पण ,बाहूबलाचा समाज संघटनेसाठी उपयोग इ.संस्कार झाले.त्यातून त्यांची प्रतिमा व वर्तन समाजाला ललामभूत ठरली.हजारो वर्षे झाली आहेत तरी श्रीरामप्रभुजी आपणास वरील संस्कारामुळे आदर्श ठरतात.
हीच गोष्ट छत्रपती शिवाजी राजेबाबत म्हणता येईल.आजही ते अखील मानव विश्वाला आदर्श वाटतात.
तर दुसरीकडे रावणासारख्या महापराक्रमी ,शिवभक्त, वेदांच्या सर्वश्रेष्ठ व्यासंगी, शुरविर असा त्याचा सप्तखंडात सर्वदूर लौकिक होता. पण.... रावणाकडे प्रचंड सामर्थ्य असूनही त्याला या सर्वाचा उपयोग स्वत:च्या विषयवासनेपलीकडे जाऊन करता आलेच नाही. कारण गम्य ते गेले तरी दुसरे गम्य ते प्राप्त करणे.हे रावणाचे ध्येय असे.हे संस्कार त्याचावर माता कैकसीच्या वाणी-वर्तनातून कोरले गेले होते. हे लक्षात घ्यावे लागेल. हीच गोष्ट मुघल सम्य्रा औरंगजेब याांच्याबाबत सांगता येईल.
याउलट श्रीरामप्रभुंनी विषयापलीकडे जाऊन निर्णय घेतला. मग तो पितृआज्ञेतून मिळालेला चौदा वर्षांच्या वनवासही सहज स्विकारला.हा संस्कार मुलाचे पित्यावरील अलौकिक प्रेम सिध्द करतो.रावणाच्या आयुष्यात त्यांस असा आदेश झाला असता तर त्याने आदेश करणारा व हट्ट धरणा-या या दोहोंच्या जागीच तत्क्षणी शिरच्छेद केला असता. या सर्व गोष्टी संस्कारावरच ठरतात. यापैकी एक श्रीरामप्रभु हे
" रघूकुल रीत सदा चली आयी
प्राण जाय पर वचन ना जाई "
अशा संस्कारात वाढत होते. तर रावण हा
" त्रिखंड मे मेरे जैसा बडा ना कोई " या संस्कारात वाढत राहीला.शेवटी या कुसंस्कारानी रावणाच्या नाश ओढवला.
संपूर्ण कुटुंबासह लंकेचा विनाश ओढवला.
प्रा.पुरूषोत्तम पटेल, उपप्राचार्य,म्हसावद, भ्रमणध्वनी-9421530412
खूप सुंदर सरजी
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर माहिती.👍👌
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहिती दिली सरजी ✍️👌👌👌
उत्तर द्याहटवाNice 👌👌👌
उत्तर द्याहटवाउत्तम माहिती
उत्तर द्याहटवायोग्य मार्गदर्शन 🙏🙏
उत्तर द्याहटवाएकदम बरोबर सुसंगती सदा घडोस सृजन वाक्य कानी पड़ों
उत्तर द्याहटवावाहह...प्रभु राम व रावण यांच ऊदाहरण देऊन संस्कार व कुसंस्कार यातील फरक छान स्पष्ट केला आहे...!!
उत्तर द्याहटवाछान लिहीलय...👌👍💐🍫
वा !छान ,सर उत्तम उदाहरणाद्वारे उत्तम संस्काराचे महत्त्व पटवून दिले👌👌👌👍👍
उत्तर द्याहटवाविजय बोरदे
👌👌👌👌✍️✍️✍️अतिशय सुंदर माहिती आणि संस्कार आणि कुसंस्कार ह्यातील फरक उदाहरण देऊन खूप सुंदर रित्या मांडला.
उत्तर द्याहटवाअप्रतिम माहिती पुर्ण लेख 👌👌👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा